मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कर्नाटकच्या वेशीवर असलेल्या 'त्या' 40 गावांसाठी शिंदे सरकारची मोठी घोषणा, उदय सामंत म्हणाले...

कर्नाटकच्या वेशीवर असलेल्या 'त्या' 40 गावांसाठी शिंदे सरकारची मोठी घोषणा, उदय सामंत म्हणाले...

 शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात लवकरात लवकर दुष्काळी जत तालुक्यात पाणी उपलब्ध करून दिल जाईल.

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात लवकरात लवकर दुष्काळी जत तालुक्यात पाणी उपलब्ध करून दिल जाईल.

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात लवकरात लवकर दुष्काळी जत तालुक्यात पाणी उपलब्ध करून दिल जाईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli, India
  • Published by:  sachin Salve

सांगली, 05 डिसेंबर : महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये जाऊ देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिंदे सरकारने धावाधाव सुरू केली आहे. जत तालुक्यामध्ये लवकरच एमआयडीसी स्थापन केली जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत आज सांगलीच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना जत तालुक्यातील गावाबद्दल नवीन घोषणा केली.

'अनेक वर्ष जतमधील लोक पाण्यापासून वंचित आहेत मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात लवकरात लवकर दुष्काळी जत तालुक्यात पाणी उपलब्ध करून दिल जाईल. जत तालुक्यात एमआयडीसी सुरू करण्याबाबत येत्या आठ दिवसात मुंबईमध्ये बैठक आयोजित केली जाईल. शंभर हेक्टर जागेमध्ये एमआयडीसी उभा करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, पाण्याबरोबरच रोजगाराच्या बाबत निर्णय घेतले जातील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

(जरा तरी लाज ठेवा; प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संभाजीराजे संतापले)

'सीमा भागाचा जो प्रश्न आहे हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे शंभूराज असतील किंवा चंद्रकांतदादा पाटील असतील प्रामाणिकपणांना सरकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही भूमिका मांडू पण ह्या ज्या काही गोष्टी चालू झालेल्या आहेत कुठे बॅनर कुठे अजून काय करणार. मला असं वाटतं की, दोन्ही राज्याच्या दृष्टीने योग्य नाही महाराष्ट्रातील जनता ही फार संयमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही मुख्यमंत्री याच्यामध्ये चर्चा करतील दोन्ही आमचे मंत्री चर्चा करतील आणि कुठेही राज्यांमध्ये वादळ होणार नाही अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्यांची राहील, असंही सामंत म्हणाले.

('शेलारमामा नेभळटासारखे फक्त...',सेनेनं उडवली आशिष शेलारांची खिल्ली)

'महाराष्ट्रमध्ये जी जनता आहे त्यांना जी काय महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित आहे. कारण मला जो या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे, त्याच्यामध्ये थोडाफार अभ्यास आहे. दोन जमिनी या ठिकाणी आहेत एक 24 एकर जमीन पिकवणे आणि दुसरी जमीन त्याच्यावर उद्योग नगरी उभारावी किंवा प्रकल्प उभारावे अशा पद्धतीची इथल्या जनतेची मागणी आहे. त्याचा विचार मुंबईला गेल्यानंतर मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलू नक्की करेल. वेळ पडल्यास पुन्हा इथे मला यावं लागलं तर पंधरा-वीस दिवसांनी आचारसंहिता संपल्यानंतर मी पुन्हा येईल. परंतु इथल्या जनतेच्या ज्या काही मागण्या आहेत. यासाठी शिंदे फडणवीस सरकारी सकारात्मक आहे. वारंवार जरी इथे यावं लागलं त्या लोकांच्या विकासासाठी इथल्या लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तरी मी स्वतः इथं भविष्यामध्ये मुख्यमंत्री पण येतील, असंही सामंत म्हणाले.

First published:

Tags: Marathi news