मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sangli : ताप येत होता म्हणून मांत्रिकाला बोलावलं, अंगात भूत आहे सांगून आर्यनला ठार केलं

Sangli : ताप येत होता म्हणून मांत्रिकाला बोलावलं, अंगात भूत आहे सांगून आर्यनला ठार केलं

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील आर्यन दिपक लांडगे या 14 वर्षांच्या शाळकरी मुलाचं निधन झालं आहे. हा मुलगा मांत्रिकाच्या मारहाणीत गंभीर जखमी झाला होता.

आसिफ मुरसळ, प्रतिनिधी

सांगली, 22 मे : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील आर्यन दिपक लांडगे या 14 वर्षांच्या शाळकरी मुलाचं निधन झालं आहे. हा मुलगा कर्नाटकातील मांत्रिकाच्या मारहाणीत गंभीर जखमी झाला होता. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी 20 मे रोजी त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे गांभीर्य ओळखून आज कवठेमहांकाळ अंनिसचे कार्यकर्ते फारुक गवंडी, सचिन करगणे, दिगंबर कांबळे, भगवान सोनंद यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावांतील त्या कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेतली. त्यांना आधार देऊन मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यास तयार केले.

आर्यनला ताप येत होता, तो लवकर बरा होत नव्हता. म्हणून त्याला कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर या गावातील आप्पासाहेब कांबळे या मांत्रिकाकडे उपचारासाठी नेले होते. मुलाला बाहेरची बाधा झाली आहे, त्याच्या अंगात भूत शिरलं आहे, ते बाहेर निघत नाही, असं मांत्रिकाने सांगितली. त्या मुलाची भूतबाधा बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाने त्या मुलाला अमानुषपणे मारहाण केली. यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असतानाच शनिवारी त्या मुलाचा मृत्यू झाला.

मांत्रिकाच्या अमानूष मारहाणीमुळे आर्यनचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, त्यामुळे या मांत्रिकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलिसांकडे केली. त्यांनी तात्काळ मुलांच्या आईला पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन तिची फिर्याद दाखल करुन घेण्याची कारवाई सुरू केली आहे. सदर गुन्हा कुडची पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असल्याने हा गुन्हा कुडची पोलीस स्टेशनला वर्ग करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First published:
top videos