मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Sangli : महापालिकेनं जिंकलं 7 कोटींचं बक्षीस!, ‘या’ कामासाठी होणार खर्च

Sangli : महापालिकेनं जिंकलं 7 कोटींचं बक्षीस!, ‘या’ कामासाठी होणार खर्च

X
अमृत

अमृत गटात सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने राज्यात द्वितीय पटकावला आहे.

अमृत गटात सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने राज्यात द्वितीय पटकावला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Sangli, India

सांगली, 08 डिसेंबर : महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 2.0 उपक्रमाअंतर्गत राज्यात स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये अमृत गटात सांगली  मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने राज्यात द्वितीय पटकावला आहे. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकासाठी महानगरपालिकेला सात कोटींचे बक्षीस शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. या रकमेतून विद्युत वाहनांना प्रोत्साहन, चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणे आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहेत. 

शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये राज्यातील 406 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. 16 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीमध्ये माझी वसुंधरा अभियान राबवण्यात आलं. स्पर्धेत अमृत गटात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक जाहीर करण्यात आला होता. मात्र, याबाबतच्या बक्षीस रकमेची घोषणा करण्यात आलेली नव्हती. आता बक्षीस जाहीर झाले असून द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल सांगलीला 7 कोटींचे बक्षीस जाहीर झाले आहे. 

या कामांसाठी होणार खर्च

बक्षीस रकमेमधून मनपा क्षेत्रात निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, त्याचबरोबर मनपा क्षेत्रात वृक्षारोपण , अमृतवने, स्मृतीवने, शहरी वने बटरफ्लाय गार्डन, सार्वजनिक उद्याने, जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल, रोपवाटिकांची निर्मिती, जलसंवर्धनाचे उपक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग व परकोलेशन, नदी, तळे व नाले यांचे पुनर्जीवन करणे, सौंदर्यकरण करणे, योग्य ऊर्जा स्त्रोत्रांचा वापरास प्रोत्साहन देण्याच्या उपाययोजना हाती घेणे, सौर उर्जेवर चालणारे एलईडी, दिवे याला प्रोत्साहन देणे, विद्युत वाहनांना प्रोत्साहन चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून देणे आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहेत. 

Nashik: पार्किंगचा पत्ता नाही पण टोईंगचा धडाका, अजब कारभारानं नाशिककर वेठीस

महापालिका क्षेत्र हरित होणार

महापालिकेला माझी वसुंधरा अभियानातून येणाऱ्या बक्षीस रकमेतून जास्तीत जास्त महापालिका क्षेत्र हरित करण्याचा आमचा सर्वांचा मनोदय असून पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने विविध उपक्रम नजिकच्या काळामध्ये हाती घेण्यात येतील तसेच पर्यावरण पूरक अनेक गोष्टींना प्रोत्साहन देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असणार आहे. पुढील स्पर्धेमध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका ही प्रथम स्थानावर येण्यासाठी महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्यासह मनपाची सर्व टीम, सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक तसेच मनपा कर्मचारी, एनजीओ हे सर्व प्रयत्नशील राहतील आणि पुढील स्पर्धेत आपली महापालिका राज्यात प्रथम क्रमांक पटकावले असा सुद्धा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.

पेट्रोल पंप धारकही निघाले कर्नाटकात, काय आहेत कारणं? Video

आयइसी टीमचे विशेष योगदान

महापालिकेला राज्यात मिळालेल्या यशामध्ये महापालिकेच्या आयइसी टीमचे विशेष योगदान आहे. या टीमने आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा, उपक्रम, योजना हाती घेतल्या व त्यांचे योग्यरित्या सादरीकरण शासनाकडे केले. यामुळेच अमृत गटात महापालिकेचा दुसरा क्रमांक येण्यास मोठी मदत झाली. यामध्ये आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सिटी समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण, स्नेहलता वर्धमाने, पर्यावरण अभियंता अजित गुजराथी, वैष्णवी कुंभार, शिवम शिंदे, सिधिक पठाण, विश्वराज काटे यांच्यासह टीमने विशेष काम केले.

एनजीओचा सहभाग

माझी वसुंधरा अभियानातील यशामध्ये मनपा आरोग्य, विद्युत, उद्यान, जलनिस्सरण, शिक्षण, बांधकाम, नगररचना, अग्निशमन या सर्व विभागाच्या खाते प्रमुख आणि टीमने तसेच सर्व एनजीओ आणि आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांनीही भरीव काम केले आहे.

First published:

Tags: Local18, Sangli