मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /गाडी समोर आले अन् 1 कोटी घेऊन गेले, सांगलीत द्राक्ष व्यापाऱ्याला लुटलं

गाडी समोर आले अन् 1 कोटी घेऊन गेले, सांगलीत द्राक्ष व्यापाऱ्याला लुटलं

द्राक्ष व्यापाऱ्याला एक कोटींना लुटलं

द्राक्ष व्यापाऱ्याला एक कोटींना लुटलं

सांगलीच्या तासगाव मध्ये एका द्राक्ष दलाल व्यापाऱ्यास एक कोटी रुपयांना लुटण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli, India

आसिफ मुरसळ, प्रतिनिधी

सांगली, 28 मार्च : सांगलीच्या तासगाव मध्ये एका द्राक्ष दलाल व्यापाऱ्यास लुटण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या व्यापाऱ्याकडून सुमारे 1 कोटी 10 लाख रुपयांना लुटलं आहे. तासगावच्या दत्तमाळ येथील गणेश कॉलनी येथे हा प्रकार घडला आहे. महेश केवलानी या व्यापाऱ्याला चोरट्यांनी लुटलं आहे. महेश केवलानी हे मूळचे नाशिकचे राहणारे असून तासगावमध्ये व्यापारासाठी आले होते.

तासगावच्या दत्तमाळ येथील गणेश कॉलनी येथे हा प्रकार घडला आहे. महेश केवलानी हे द्राक्ष व्यापारी असून तासगाव तालुक्यातील द्राक्ष शेतकऱ्यांकडून द्राक्ष घेऊन ते विक्री करतात. केवलानी यांनी खरेदी केलेल्या द्राक्षाचे पैसे देण्यासाठी मंगळवारी सांगलीतून आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून एक कोटी 10 लाख रुपयांची रक्कम एका बॅगेत भरून तासगावला येत होते. ते राहत असलेल्या गणेश कॉलनी येथे पोहचले असता,अचानक सहा ते सात जणांनी केवलानी यांची स्कार्पिओ गाडी अडवली आणि यावेळी गाडीतील चालक आणि केवलानी यांच्यासह त्यांच्या सोबत असणाऱ्या कामगाराला मारहाण सुरू केली. यामध्ये खाली पडल्याने त्यांना डोक्याला मार लागला, या दरम्यान हल्लेखोरांनी गाडीत असणारी एक कोटी दहा लाख रुपये रकमेची बॅग लंपास करत घटनास्थळावरून पोबारा केला.

घटनास्थळी तासगाव पोलिसांनी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला, तर सदर घटनेची माहिती मिळताचं पोलीस अधीक्षक बसवराज तेली हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. तेली यांनी व्यापारी महेश केवलानी यांच्याकडून घटनेची माहिती घेत, लुटारूंच्या शोध घेण्यासाठी तीन ते चार पथके पोलिसांच्या कडून तैनात केली आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली.

या घटनेमध्ये हल्लेखोरांनी महेश केवलानी यांच्यावर पाळत ठेवून त्यांचं पाठलाग करत त्यांना लुटले असून प्लॅनिंग करून हा कट रचल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

First published:
top videos