सांगली, २६ मार्च : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएसोबत येण्याची ऑफर दिली. देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी नागालँडप्रमाणे इतर ठिकाणीही एनडीएसोबत यावं असं आठवले म्हणाले. तसंच यावेळी रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना सल्लासुद्धा दिला आहे.
रामदास आठवले म्हणाले की, "नागालँडप्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी एनडीएसोबत यावं. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध,मोदींच्या कडून पवारांचें अनेक वेळा कौतुक झाले आहे." राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईवरही रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीय.
राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई योग्य असल्याचं सांगताना म्हटलं की, राहुल गांधी हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. या कारवाईत भाजपचा संबंध नसून राहुल गांधी यांनी आपलं तोंड सांभाळून बोलायला हवं असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला. मोदी यांच्यावर टीका करून काँग्रेसचा फायदा होत नाही आणि पक्ष वाढत नाही असेही रामदास आठवले म्हणाले.
राज ठाकरेंनाही रामदास आठवले यांनी टोला लगावला. राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्सपर्ट आहेत. त्यांनी भोंग्याचा मुद्दा वाढवू नये. भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील ते बघावे. राज ठाकरे यांनी चांगले काम करून आपला पक्ष वाढवावा असं रामदास आठवले यांनी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ramdas athawale