मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...तर एनओसीची वाट न बघता कर्नाटकात जाऊ, जतच्या नागरिकांचा अल्टिमेटम!

...तर एनओसीची वाट न बघता कर्नाटकात जाऊ, जतच्या नागरिकांचा अल्टिमेटम!

सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातला वाद पुन्हा एकदा सुरू झाला आहे. सांगलीतल्या जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गांभीर्यानं विचार करतंय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli, India
  • Published by:  Shreyas

जत, 24 नोव्हेंबर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकारण तापलेलं असताना कर्नाटकनं नवी कुरापत काढली. सांगलीतल्या जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गांभीर्यानं विचार करतंय, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधान केलं. जतमधील 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्रानं गांभीर्यानं विचार करावा, असंही बोम्मई म्हणाले. पाण्याच्या मुद्यावरून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सामील व्हायचं असल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर जत तालुका पाणी कृती समितीने महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी आहे, पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ, असा अल्टिमेटम जत तालुका पाणी कृती समितीने दिला आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा डिवचलं, आता तर थेट फडणवीसांचं नावच घेतलं!

'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर मग महाराष्ट्र मधील सत्ताधारी आणि विरोधकांना जाग आली आहे, इतके दिवस पाणी आणि अन्य सुविधा जत तालुक्याला का दिल्या नाहीत?' असा सवाल समितीकडून उपस्थित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी आहे, पाणी द्या नाही तर आम्ही एनओसीची वाट बघणार नाही, थेट कर्नाटकात जाऊ, असा इशारा जत तालुका पाणी कृती समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी दिला आहे. याबाबत उद्या शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता उमदीमध्ये ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व बाजुला ठेवलं त्यांनी.... मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर

First published: