स्वप्निल एरंडोलीकर, प्रतिनिधी
सांगली, 02 फेब्रुवारी : दक्षिण महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील मिरजेतील जनावरांच्या बाजाराची उलाढाल जवळपास निम्म्यावर आली आहे. लम्पीचा बाजारावर मोठा परिणाम झाला असून जनावरांचे खरेदी व्रिकी व्यवहार थंडावले आहेत. बाजारातील उलाढालीबरोबरच गाई व म्हशी या दुभत्या जनावरांच्या दरातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे मिरजेच्या जनावरे बाजारातील खरेदीविक्रीवर परिणाम झाला आहे.
गाय व म्हशीमध्ये लम्पीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे बाजार गतवर्षी सप्टेंबरपासून बंद करण्यात आले होते. यावर्षी जानेवारीत जनावरांचे बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात यात केवळ म्हैस, रेडा, शेळ्या व मेंढ्या यांचाच बाजार भरणार आहे. गाय, जर्सी गाय, बैल यांच्या बाजारावर अजूनही बंदी कायम आहे. मिरजेच्या जनावरांच्या आठवडा बाजारात सरासरी ३५० मोठी व ३०० लहान जनावरांच्या विक्रीतून प्रत्येक आठवड्याला सरासरी ४० लाखांची उलाढाल होते. मात्र, बंदीनंतर हीच उलाढाल २० लाखांवर आली आहे.
गाय, बैलांचे बाजार सुरू करण्याची मागणी
टसांगली जिल्ह्यातही जनावर बाजार सुरू केल्यास शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. सांगली जिल्ह्यामध्ये जनावरांचे वॅक्सिन हे जवळपास 90% पूर्ण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ निर्णय घेऊन जनावर बाजार सुरू करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे
जपानी पद्धतीनं सांगली झाली हिरवीगार, 2 वर्षांमध्येच तयार झालं जंगल, Video
मिरजेसह कराड, फलटण, सातारा, कोल्हापूर येथील जनावरे बाजारातही गाय व बैल या जनावरांशिवाय म्हैस, शेळ्या मेंढ्यांची विक्री सुरू आहे. बाजारातील एकूण उलाढालीपासून ०.८ टक्के उत्पन्न बाजार समितीला मिळते.
म्हशीचे बाजार सुरू
जिल्ह्यांतर्गत म्हशीचे बाजार भरविण्यास व गुरांच्या वाहतुकीस 6 जानेवारी पासून जिल्हाधिकाऱ्यांनी सशर्त परवानगी दिली आहे, त्यानुसार गुरांचे 28 दिवसांपूर्वी लम्पी प्रतिबंधक लसीकरण गुरांची म्हशींची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग नंबर असणे, इनाफ पोर्टलवर नोंदणी, आरोग्य दाखला सोबत बाळगणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer, Local18, Sangli