मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Sangli : 14 कोटींच्या जुन्या नोटांवर बँकेत साचली धूळ, देखभाल करणारे कर्मचारी परेशान, Video

Sangli : 14 कोटींच्या जुन्या नोटांवर बँकेत साचली धूळ, देखभाल करणारे कर्मचारी परेशान, Video

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक अजूनही तब्बल 14 कोटी 16 लाखांच्या जुन्या नोटा सांभाळत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli, India

सांगली, 25 नोव्हेंबर : केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आणि रातोरात 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद झाल्या. नोटाबंदीला सहा वर्षाचा कालावधी लोटला. मात्र, सांगली  जिल्हा मध्यवर्ती बँक अजूनही तब्बल 14 कोटी 16 लाखांच्या जुन्या नोटा सांभाळत आहे. या कोट्यावधीच्या नोटा सांभाळताना बँकचे कर्मचारी परेशान आहेत. बँकेतील नोटा सांभाळण्यासाठी बँकेला दैनंदिन कसरत करावी लागत आहे. 

पाच ते सहा कोटींचा फटका

भारतीय चलनातून 2016 साली 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बाद केल्या. यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेने बदलून देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर बँकेने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, या जुन्या नोटांमुळे बँकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. नोटाबंदीपूर्वीचे 14.72 कोटी रुपये अद्यापही बँकेत धुळखात पडून आहेत. रिझर्व्ह बँकेने या नोटाबाबतचा निर्णय घेतला नसल्याने सहा वर्षात बँकेला पाच ते सहा कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचे सांगितले जात आहे. बँकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु नोटाबंदी पूर्वीच्या रकमेबाबत न्यायालयामध्ये निर्णय प्रलंबित आहे. 

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 मध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या आदेशानंतर बंद करण्यात आलेल्या नोटांचा भरणा करण्यात आला. रिझर्व्ह बँकेने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा सव्वा वर्षानंतर स्वीकारल्या होत्या. सांगली जिल्हा बँकेकडे सहा वर्षापासून पडून असलेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा झाल्या. त्यात जिल्हा बँकेतील 301 कोटी रुपयांचा समावेश आहे. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयापूर्वीच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेने स्वीकारण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे मागील सहा वर्षापासून नोटाबंदीपूर्वीच्या रकमेबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Video : पोस्ट विभागाच्या योजना लय भारी, गुंतवणुकीत झाली 30 टक्क्यांनी वाढ

नोटा स्वीकारण्यास मनाई

सांगली जिल्हा बँकेत 14.72 कोटी रुपये धुळखात पडून आहेत. रिझर्व्ह बँकेने ही रक्कम स्वीकारली नसल्यामुळे बँकेला सहा वर्षात सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांचा तोटा झाला. केंद्र सरकारच्या अर्थ विभागाने जुन्या नोटांबाबत जून 2017 रोजी जिल्हा बँकांकडील जुन्या नोटा स्वीकारण्याबाबतचे आदेश दिले. त्यानंतर 29 जून रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करून नोटा स्वीकारणार असल्याचे जाहीर केले.10 जुलै रोजी त्यांनी आदेश देऊन नोटा मागवून घेतल्या. मात्र, जिल्हा बँकांकडील सर्व जुन्या नोटा स्वीकारण्याऐवजी रिझर्व्ह बँकेने केवळ नोटाबंदीनंतर जमा झालेल्या नोटांचाच स्वीकार केला. नोव्हेंबरपूर्वीच्या नोटा स्वीकारलेल्या नाहीत. 

जिल्हा बँकेवर 14.72 कोटी रुपयांच्या रकमेसाठी संघर्षाची वेळ आली आहे. 2018 मध्ये नाबार्डने या नोटांमध्ये अडकलेली रक्कम संशयित बुडीत धरावी, असे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्हा बँका अडचणीत आल्या. या नोटा रिझर्व्ह बँकेने जमा करून घ्याव्यात, अशी बँकांची भूमिका आहे.

First published:

Tags: Local18, Sangli