घरफोडी करून गर्लफ्रेंडला पुरावा म्हणून पाठवायचा सेल्फी, चोराचा धक्कादायक खुलासा

घरफोडी करून गर्लफ्रेंडला पुरावा म्हणून पाठवायचा सेल्फी, चोराचा धक्कादायक खुलासा

घरफोड्या करणाऱ्या चोराला फिल्मी स्टाइल पाठलाग करून पोलिसांनी पकडलं आणि त्यानंतर केलेल्या चौकशीत त्यानं धक्कादायक खुलासे केले आहेत.

  • Share this:

सांगली, 26 फेब्रुवारी : चोरी करणाऱ्यांकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर येतात. चोरी करण्याच्या पद्धती, चोरीचे कारण, त्यानंतर चोरीचा मुद्देमाल कसा खपवला यांसारख्या बाबींची धक्कादायक माहिती चोरांकडून दिली जाते. आता सांगलीत अशाच एका चोराला अटक केली त्याने दिलेल्या माहितीने पोलिसही हैराण झाले आहेत. इस्लामपूर पोलिसांनी एका चोराला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेक खुलासे त्याने केले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, इस्लामपूर पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या चोराला राष्ट्रीय महामार्गावर फिल्मी स्टाइल पाठलाग करून पकडलं. त्यानंतर चौकशी केली असता त्यानं गर्लफ्रेंडच्या चैनीसाठी, तिला आनंदी ठेवण्यासाठी चोरी केल्याचं सांगितलं आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताच नाव कुणाल शिर्के असं आहे. अट्टल दरोडेखोर असलेल्या कुणालला पोलिसांनी अटक केली त्यावेळी त्याच्याकडे 82 हजार रुपये सापडले. बंगळुरू महामार्गावर त्याला पाठलाग करून पकडण्यात आलं. कुणालने पोलिसांना सांगितलं की, चोरी केल्यानंतर मी माझ्या गर्लफ्रेंडला चोरी करत असलेला आणि त्या ठिकाणी सेल्फी काढून पाठवत होतो.

कुणालने इस्लामपूरमध्ये 7 घरफोड्या केल्याची कबुली दिली. इस्लामपूरसह सातारा सांगलीत अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याची माहिती दिली आहे. सध्या त्याची अधिक चौकशी सुरु असून आणखी काही घरफोड्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्याच्याकडील मुद्देमाल ताब्यात घेऊ तसेच त्याला न्यायालयासमोर सादर करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

First published: February 26, 2020, 8:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या