तो सपासप वार करत होता, आणि लोक पाहत होते!, पोलिसाची हत्या सीसीटीव्हीत कैद

तो सपासप वार करत होता, आणि लोक पाहत होते!, पोलिसाची हत्या सीसीटीव्हीत कैद

सांगलीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:

सांगली, 18 जुलै : सांगलीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. समाधान मानटे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांच्यवर धारदार शस्त्राने वार करुन खून: करण्यात आला आहे. विश्रामबाग येथील कुपवाड रस्त्यावर हॉटेल रत्ना डिलक्स जवळ मध्यरात्री ही घटना घडली आहे. भर रस्त्यात हा प्रकार घडल्याने सांगली परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

2013साली सांगली जिल्हा पोलीस दलात भरती झालेले समाधान मानटे हे मुळचे बुलढाण्याचे आहेत. सामगसमाधान मानटे यांच्यावर तब्बल 18 वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. हाती लागलेल्या सीटीव्हीनुसार यात 2 हल्लेवार दिसत आहेत. काल रात्री ड्यूटी संपल्यानंतर ते रत्ना डिलक्समध्ये जेवण्यासाठी गेले होते. जेवून झाल्यानंतर बिल देत्यावेळी त्यांचा 2 ग्राहकांशी वाद झाला आणि यात त्यांनी धारदार शस्त्राने समाधान यांच्यावर 18 वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

वाशीच्या एमजीएम रुग्णालयाची सिस्टीम हॅक, बदल्यात हॅकरने मागितले...!

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थली दाखल झाले. दरम्यान सीसीटीव्ही तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने समाधा यांच्यावर हल्ला केला आहे. पण या सगळ्यात आजूबाजूच्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. कोणीही समाधान यांच्या मदतीला धावून आलं नाही.

हॉटेलकडून हाती लागलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने आता पोलीस तपास करत आहेत. पण नेमका कोणता वाद झाला आणि समाधान यांची ही निर्घृण हत्या करण्यात आली हे अद्याप समोर आलेलं नाही.

हेही वाचा...

Happy Birthday Priyanka Chopra: प्रियांका चोप्राच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

श्रेयस तळपदे झाला तब्बल तीन मुलांचा बाप

ITR फाईल करतेवेळी या 8 खर्चांवर क्लेम करायला विसरू नका

First published: July 18, 2018, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading