मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

डीएसकेंच्या अडचणीत वाढ, सांगली पोलिसांनी पत्नी आणि मुलासह येरवडा जेलमधून केली अटक

डीएसकेंच्या अडचणीत वाढ, सांगली पोलिसांनी पत्नी आणि मुलासह येरवडा जेलमधून केली अटक

कुलकर्णी कुटुंबास पुण्याच्या येरवडा जेलमधून अटक करण्यात आली आहे.  याबाबत सांगलीत 103 ठेवीदारांची 4 कोटी 27 लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कुलकर्णी कुटुंबास पुण्याच्या येरवडा जेलमधून अटक करण्यात आली आहे. याबाबत सांगलीत 103 ठेवीदारांची 4 कोटी 27 लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कुलकर्णी कुटुंबास पुण्याच्या येरवडा जेलमधून अटक करण्यात आली आहे. याबाबत सांगलीत 103 ठेवीदारांची 4 कोटी 27 लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे, 11 डिसेंबर : डीएसके ग्रुपच्या फसवणुकीच्या तक्रारीनंतर सांगली पोलिसांनी डीएस कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाला येरवडा जेलमधून ताबा घेत अटक केली आहे. सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची पुण्याच्या येरवडा जेलमधून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. सांगलीच्या 103 ठेवीदारांची डीएसके ग्रुपकडून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.  कुलकर्णी कुटुंबास पुण्याच्या येरवडा जेलमधून अटक करण्यात आली आहे. याबाबत सांगलीत 103 ठेवीदारांची 4 कोटी 27 लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारपर्यंत कुलकर्णी कुटुंबियास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्यामध्ये स्वत: डीएस कुलकर्णी, पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष यांचा समावेश आहे.

डीएसके आधीच अटकेत होते. त्यांच्यावर गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. डीएसके गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्राचे 3 अधिकारी आणि डीएसकेंच्या एका अभियंत्याची चौकशीही झाली होती. एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता त्यांना अटक करण्यात आली होती.

इतर बातम्या - भाजपची बैठक का टाळली? अखेर पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण

डीएसकेंच्या कागदपत्रांमध्ये अनेक अनियमितता असल्याचं माहीत असूनही त्यांना बेकायदेशीररित्या कर्ज देण्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर होता. बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आर. पी. मराठे, तत्कालीन क्षेत्रीय व्यवस्थापक एन. एस. देशपांडे, माजी एमडी सुशील महुनोत आणि डीसके डेव्हलपर्सचे मुख्य अभियंते राजीव नेवासकर यांची चौकशी झाली होती.

प्रकल्पाला ज्या कारणासाठी कर्ज देण्यात आले त्या पैशाचा  बँक अधिकाऱ्यांशी संगनमताने अपहार करण्यात आला होता. बँकेचा पैसा शेवटी सार्वजनिक पैसा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे सर्व बँकांना लागू आहेत. सार्वजनिक संस्थांच्या  पैशांचा  उपयोग खाजगी पैसा असल्यासारखा करण्यात आला. या व्यवहारांमध्ये कोणताही कायदेशीरपणा नाही.

इतर बातम्या- भारतीय पोषाख परिधान करून 'Nobel' घेण्यासाठी पोहोचले अभिजीत बनर्जी, एस्टर डफलो

असा आरोप आहे की बँकेने अनेक अनियमितता माहीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीरपणे कर्जे  मंजूर केली. कर्जे मंजूर करण्यापूर्वी कोणतीही काळजी घेतली नाही. कर्ज मंजूर करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नाही. कर्जाचा वापर ज्या कारणासाठी  ते दिले होते त्याच कारणासाठी ते वापरले जात आहे की नाही हे तपासले नाही. एक कर्ज तर "कॅश फ्लोचा तात्पुरता मेळ घालण्यासाठी " या कारणासाठी मंजूर करण्यात आले होते.

First published: