मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sachin Vaze arrested : भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचा घणाघात

Sachin Vaze arrested : भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचा घणाघात

'सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करायची असेल ती करावी. तपास यंत्रणानी त्यांच्याकडे आहे'

'सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करायची असेल ती करावी. तपास यंत्रणानी त्यांच्याकडे आहे'

'सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करायची असेल ती करावी. तपास यंत्रणानी त्यांच्याकडे आहे'

सांगली, 14 मार्च : मुंबईत स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाचे अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze arrested) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA Goverment) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप प्रत्यारोप सुरू झाला आहे. भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole )यांनी केली.

सांगलीमध्ये  (Sangali) पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली. 'महाराष्ट्रला बदनाम करण्याचे एक धोरण हे विरोधकांच्या माध्यमातून सुरू झाले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आले तेव्हापासून याच घडामोडी दिस आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने काय अहवाल दिला आहे, हे ही पाहण्याचे ठरेल. सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करायची असेल ती करावी. तपास यंत्रणानी त्यांच्याकडे आहे. त्यांना काय टेस्ट करायची असेल तर त्यांनी करावी. डबल ढोलकी वाजवायचे काम विरोधक करत आहेत. त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही' अशी टीका नाना पटोले यांनी केली.

नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी तपासणं आवश्यक; सरकारकडून महत्त्वाची माहिती

'विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आहे. 171 आमदारांचा विकास आघाडीला पाठिंबा आहे निवडणूक ला घाबरत नाही. विशेष अधिवेशन घेऊन येत्या काही दिवसात अध्यक्ष निवड होईल. कुणाला घाबरण्याचे कारण नाही', असंही नाना पटोले म्हणाले.

'केंद्र सरकार राज्याला जी मदत हवी आहे, ती करत नाही. राजभवन हे भाजपभवन झाले आहे, राज्याचे ते प्रमुख आहेत? अशा वेळी पक्षपात करणे चुकीचे आहे', असं म्हणत नाना पटोले यांनी राज्यपालांवर टीका केली.

'विरोधक यांची भाषा सतत बदलत आहे. आधी सत्ता जाईल असे बोलत होते. आता राष्ट्रपती राजवट लागेल, असे विरोधक बोलत आहे. जनतेचे प्रश्न वाऱ्यावर सोडून विरोधक सत्ता कशी जाईल असे विरोधकांचे काम सुरू आहे', अशी टीकाही पटोले यांनी केली.

...म्हणून वेस्ट इंडिजचे महान बॅट्समन व्हिव रिचर्ड्स यांनी मानले मोदींचे आभार

'काँग्रेसमधून जी लोकं बाहेर पडली ती भाबडी लोकं होती ते गेले. आम्ही आता तरुणांना संधी देणार, भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत,  सांगलीचा पुढचा खासदार काँग्रेसचाच होणार  आहे. महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष टिकणार आहे', असा दावाही पटोले यांनी केला.

'सरकार आल्यानंतर मोदी म्हणाले होते की, मी पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करेन आतापर्यंत केली का सही?  राम मंदिराच्या नांवाने लोकांना लुटण्याचा धंदा सुरू आहे', अशी टीकाही पटोले यांनी केली.

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात सचिन वाझे प्रकरणात प्रतिक्रिया

 

सरकारं बदलत असतात पण पोलीस यंत्रणा आहे. तीच असते. महाराष्ट्र आणि मुंबईची पोलीस यंत्रणा ही जग प्रसिद्ध आहे. स्कॉटलँड यार्ड नंतर आपल नावं घेतले जाते. एवढं महत्व आपल्या पोलिसांचे आहे. पोलिसांचं मनोबल खच्चीकरण होणार नाही याची काळजी सत्ताधारी आणि विरोधकांनी घ्यायला हवी. विरोधक सत्तेत होते तेव्हा तेच पोलीस दल होतं. आपले पोलीस दल सक्षम आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही, शरद पवारांचं टीकास्त्र

विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपासासाठी आग्रह धरण म्हणजे आम्हाला काळजीच वाटत की यात कुठले राजकारण नाही ना?  सचिन वाझे प्रकरणात काळजीच्या गोष्टी वाटत आहे. मात्र तपास सुरू असल्याने त्यावर बोलणे योग्य नाही, असंही थोरातांनी स्पष्ट केलं.

First published:
top videos