• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या मेडिकलवर पोलिसांची धाड, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय करत होता औषध विक्री

नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या मेडिकलवर पोलिसांची धाड, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय करत होता औषध विक्री

मेडिकलमध्ये नशेच्या गोळ्यांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

  • Share this:
सांगली, 3 सप्टेंबर : मिरज रेल्वे स्टेशन जवळील आणि मिरज शहर स्टँड परिसरात नशेच्या गोळ्याचे सेवन करून नशेबाज तरुणांचा अनेक दिवसांपासून धुमाकूळ सुरू आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून दररोज नशा करून लोकांना त्रास देण्याचे सुरू आहे. म्हणूनच या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. मिरज महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेडिकलवर पोलिसांनी कारवाई केली आहे. महात्मा गांधी चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय मेडिकलमधील गोळ्या देऊ नये असे आवाहन केले होते. पण तरी ही मेडिकल दुकानदार नशेबाज तरुणांना नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी धडक करावाई केली आहे. कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याला ठाणे मनपा आयुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस जबाबदार? महत्त्वाची कागदपत्रे न्यूज 18 लोकमतच्या हाती एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात नशेच्या गोळ्या सापडल्या. याबाबत चौकशी केली असता सांगली मिरज रोडवरील आयुष मेडिकलमधून त्याने गोळ्या घेतल्याचे सांगितले. त्याला पुन्हा आयुष मेडिकलमधून गोळ्या आणण्यासाठी सांगितले आणि मेडिकल बाहेर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी गुन्हेगाराने डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय मेडिकलमध्ये जाऊन 40 नशेच्या गोळ्या आणल्या. यावेळी मेडिकल दुकानदाराने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय गोळ्या दिल्या. त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकून आयुष्य दुकानदारास रंगेहात पकडले आणि ताब्यात घेतले आहे. मिरज शहरात सध्या नशेखोर लुटारुंकडून अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत. पोलिसांनी यापैकी काहींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडील चौकशीत हे गुन्हेगार केवळ दारू आणि गांज्याची नशा करत नाहीत तर नशेसाठी औषध दुकानातून नशेची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकत घेऊन त्याचे नशेसाठी सेवन करत असल्याचे समजले होते. याबाबत पोलिसांनी औषध विक्रेत्यांना चिट्टी विना ओषध देऊ नये इशाराही दिला होता. या बाबत पोलिसांना हा अंदाज होता मेडिकलमध्ये असे औषध दिले जात असणार. सध्या याबाबत पोलिसांनी फूड आणि ड्रग्ज विभागाला कळवले असून एफडीएने संबंधित मेडिकलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Published by:Sunil Desale
First published: