मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सांगलीत बचावकार्य करणारी बोटचं अडकली पुराच्या पाण्यात; नगरसेवकासह पालिकेची कर्मचारी बोटीत, Watch Video

सांगलीत बचावकार्य करणारी बोटचं अडकली पुराच्या पाण्यात; नगरसेवकासह पालिकेची कर्मचारी बोटीत, Watch Video

Sangli flood Rescue boat:  बचावकार्य करणारी (The Rescue Boat)बोटचं पाण्यात अडकली असल्याची घटना घडली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.

  • Published by:  Pooja Vichare

सांगली, 25 जुलै: सांगलीत (Sangli) बचावकार्य करणारी (The Rescue Boat) बोटचं पाण्यात अडकली असल्याची घटना घडली आहे. बचाव कार्य करत असताना महापालिकेच्या बोटीचे पात तुटल्याने बोट पाण्यातच अडकली.

लाकडी ओंडक्यामुळे बोटीचं पात तुटलं त्यानंतर ही घटना घडली. एक महिला, नगरसेवक मंगेश चव्हाण, महापालिकेचे दोन कर्मचारी, एक पुरुष असे सहा लोकं पुराच्या पाण्यात अडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

सांगली कोल्हापूर रोडवरील हॉटेल उदय शेजारी घटना घडली. डांबाला बोट बांधून ठेवली असून लोकं बोटीतच अडकून पडलेत.

सांगली जिल्ह्यात आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा (Krishna River Sangli) आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 54 फुटांच्यावर गेली आहे. कृष्णा नदीवरील पलूस तालुक्यातील नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाळवा, नागठाणे, शिरगाव, नागराळे या गावांचा संपर्क तुटला आहे. सांगलीच्या अनेक भागात पाणी शिरले आहे. हळूहळू पाण्याची पातळी वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.

तुझा पगार किती?, उत्तर ऐकताच अजित पवार झाले बेचैन

तर जिल्ह्यातील 1 लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 30 ते 30 हजार जनावरे स्थलांतर करण्यात आली आहेत. काल पावसाने उघडीप दिली होती. मात्र सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सांगलीला धोका निर्माण झाला आहे. वारणा नदीवरील काही बंधारे, पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वारणा नदीवरील मांगले-कांदे पूल, ऐतवडे खुर्द-निलेवाडी पूल, कणेगाव ते भरतवाडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, तर अन्य तालुक्यांमध्ये संततधार सुरु आहे. धरण पाणलोट क्षेत्रासह शिराळा तालुक्यातील मुसळधार पाऊस सुरु असून धरणातून विसर्गही सुरु आहे.

First published:

Tags: Boat, Rain, Rescue operation, Sangali