सांगलीत मोठी दुर्घटना : बचावकार्यादरम्यान बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू

सांगलीत मोठी दुर्घटना : बचावकार्यादरम्यान बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू

बोटीतील 10 जणांचा मृत्यू झाला तर काहीजण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

सांगली, 8 ऑगस्ट : सांगलीतील ब्रम्हनाळमधील पलूस इथं पुरात अडकलेल्या लोकांना वाचवताना बोट बुडाल्याची माहिती आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही खासगी बोट असल्याचीही माहिती आहे.

पुरात अडकलेल्या 25 ते 30 लोकांना घेऊन जाताना खासगी बोट बुडाली. त्यानंतर या बोटीतील 10 जणांचा मृत्यू झाला तर काहीजण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बचावकार्यादरम्यान ही दुर्घटना घडली आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून अजून या बोट दुर्घटनेबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण 25 ते 30 लोकांना पुरातून बाहेर काढण्यात येत होतं. पण अर्ध्या वाटेतच ही बोट बुडाली. क्षमतेपेक्षा जास्त लोक एकाच बोटेत बसल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पूरस्थिती आणि बचावकार्य

सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूरस्थिती अजूनही गंभीर असली तरी मदत आणि बचाव कार्ययुद्ध पातळीवर सुरू आहे. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 4 लाख क्युसेकपर्यंत वाढवण्यात आल्याने पूरस्थिती नियंत्रणात येईल. विभागातील 1 लाख 32 हजार 360 पूरबाधितांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बचाव व मदत कार्यावर भर दिला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

VIDEO : ट्रॅफिक सिग्नल तोडून महिलेचाच राडा; पोलिसाच्या अंगावर घातली गाडी, मीडियाचा कॅमेराही तोडला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: sangli
First Published: Aug 8, 2019 01:00 PM IST

ताज्या बातम्या