ब्रम्हनाळमध्ये बोट उलटली.. मृतांचा आकडा वाढला, आणखी 8 मृतदेह सापडले

ब्रम्हनाळमध्ये बोट उलटली.. मृतांचा आकडा वाढला, आणखी 8 मृतदेह सापडले

पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे आलेल्या महापुरात बुडालेल्या मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे. आणखी आठ मृतदेह सापडले आहेत.

  • Share this:

आसिफ मुरसळ, (प्रतिनिधी)

सांगली, 10 ऑगस्ट- पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे आलेल्या महापुरात बुडालेल्या मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे. आणखी आठ मृतदेह सापडले आहेत. ब्रह्मनाळ येथे कृष्णा नदीच्या महापुरात बोट उलटून नऊ जणांना जलसमाधी मिळाल्याची घटना गुरुवारी (8 ऑगस्ट) घडली होती. बोटीतील काहीजण बेपत्ता होते. आता बेपत्ता नागरिकांचे मृतदेह सापडलेले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन तर शनिवारी सकाळी पाच मृतदेह सापडले आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून या मृतदेहांचा शोध घेण्यात आला आहे. सापडलेल्या या मृतदेहांमध्ये तीन महिला, एक मुलगा आणि एक मुलगीचा समावेश आहे. या घटनेतील मृतांची संख्या आता 17 वर पोहोचली आहे.

सुरेखा नरुटे, रेखा वावरे(40), मनीषा पाटील (अडीच वर्षे),क्षिति पाटील(7), राजमती चौगुले(65), बाबासो पाटील,कल्पना कारंडे, लक्ष्मी वडेर(70),पियू नरुटे (दीड महिना), सौरभ गडदे, सुवर्ण तानाजी गडदे, गंगूबाई कस्तुरे, पप्पीताई पाटील, सुमन रोगे, कोमल नरुटे अशी मृतांची नावे आहेत.

अशी घडली होती घटना..

पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे आलेल्या पुरात अडकलेल्या 25 ते 30 जणांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाताना एक बोट बुडाली. त्यानंतर या बोटीतील 10 जणांचा मृत्यू झाला तर काहीजण बेपत्ता झाले होती. ही खासगी बोट होती. क्षमतेपेक्षा जास्त लोक एकाच बोटेत बसल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, बोट एका झाडात अडकल्याने ती उलटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

पूरस्थिती आणि बचावकार्य

सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूरस्थिती अजूनही गंभीर असली तरी मदत आणि बचावकार्ययुद्ध पातळीवर सुरू आहे. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 4 लाख क्युसेकपर्यंत वाढवण्यात आल्याने पूरस्थिती नियंत्रणात येईल. विभागातील सुमारे सव्वा चार लाख पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

VIDEO : मृत्यूनंतरही सुटका नाही.., अखेर आजींचा मृतदेह बोटीतून आणला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 06:25 PM IST

ताज्या बातम्या