मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Sangli Farmer Suicide : बँकेचा तगादा, अस्मानी संकट सांगलीच्या तरूण शेतकऱ्यांने अडीच लाखांसाठी उचलले टोकाचे पाऊल

Sangli Farmer Suicide : बँकेचा तगादा, अस्मानी संकट सांगलीच्या तरूण शेतकऱ्यांने अडीच लाखांसाठी उचलले टोकाचे पाऊल

पश्चिम महाराष्ट्राला अस्मानी संकटाने पछाडले आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा सोलापूर  जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी नेहमी निराशा येत आहे. (Sangli Farmer Suicide)

पश्चिम महाराष्ट्राला अस्मानी संकटाने पछाडले आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी नेहमी निराशा येत आहे. (Sangli Farmer Suicide)

पश्चिम महाराष्ट्राला अस्मानी संकटाने पछाडले आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी नेहमी निराशा येत आहे. (Sangli Farmer Suicide)

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 03 ऑगस्ट : मागच्या चार वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्राला अस्मानी संकटाने पछाडले आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा सोलापूर  जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी नेहमी निराशा येत आहे. यामुळे या भागातील शेतकरीही आत्महत्येचा विचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान सांगली जिल्हातील एका शेतकऱ्यांने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा शेतकरी द्राक्ष बागायतदार आहे. 2.50 लाखांच्या कर्जासाठी त्याने हे पाऊल उचल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Sangli Farmer Suicide)

कर्जाला कंटाळून सोनी (ता. मिरज) येथील शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. सदरची घटना मंगळवारी दुपारी मणेराजुरी येथील कोड्याच्या माळाजवळ उघडकीस आली. दीपक सुबराव सूर्यवंशी (वय 42) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

हे ही वाचा : धर्मवीर आनंद दिघेंच्या पुतण्यावर बलात्काराचा गुन्हा, ठाकरेंच्या सेनेला धक्का

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, दीपक सूर्यवंशी यांची सोनी येथे अडीच एकर द्राक्षबाग आहे. शेतीसाठी त्यांनी बँकांकडून सुमारे दोन ते अडीच लाख रुपये कर्ज घेतले होते. परंतु, वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे त्यांचे शेतीमध्ये मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे ते बँकांचे कर्ज फेडू शकले नव्हते.

कर्ज फेडण्यासाठी बँकांकडून तगादा सुरू होता. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये होते. सोमवारी ते तासगाव तालुक्यातील जाय गव्हाणला जावून येतो, असे सांगून घरातून निघून गेले. परंतु मंगळवारी दुपारपर्यंत ते घरी परतले नाहीत. नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान मंगळवारी दुपारी सूर्यवंशी हे मणेराजुरी येथील कोड्याच्या माळाजवळ मृतावस्थेत सापडले. याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे.

हे ही वाचा : उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या शहरप्रमुखांसह 6 जणांना अटक

बीड जिल्ह्यात रोज एक आत्महत्या

बीड जिल्ह्यात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात पीक कर्जमाफीतील त्रुटी, पीक कर्जवाटपातील दिरंगाई, हमी भाव, उत्पादित मालासाठी बाजारपेठ नसणे या कारणांनी जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. त्यातून कर्जबाजारीपणा व कर्ज फेडण्याच्या चिंतेतून शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर कोरोनाकाळात नुकसानीत गेलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यांतील 181 दिवसांत तब्बल 138 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. हाच आकडा मागच्या वर्षीच्या (2021) सहा महिन्यांत 84 होता. म्हणजेच तुलनेने यंदा 54 आत्महत्या अधिक झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे जून महिन्याच्या 30 दिवसांत जिल्ह्यात 30 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

First published:

Tags: Farmer, Sangli, Sangli (City/Town/Village), Sangli news, Suicide news

पुढील बातम्या