मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Sangli district bank election result: काँग्रेस आमदार विक्रम सावंत पराभूत, 'करेक्ट' कार्यक्रम केल्याची चर्चा

Sangli district bank election result: काँग्रेस आमदार विक्रम सावंत पराभूत, 'करेक्ट' कार्यक्रम केल्याची चर्चा

काँग्रेस आमदार विक्रम सावंत पराभूत, 'करेक्ट' कार्यक्रम केल्याची चर्चा

काँग्रेस आमदार विक्रम सावंत पराभूत, 'करेक्ट' कार्यक्रम केल्याची चर्चा

Sangli district bank election result: सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत.

सांगली, 23 नोव्हेंबर : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचे निकाल (Sangli District Central co operative bank election result) हाती आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पॅनलचा (Mahavikas Aghadi pannel) एकतर्फी विजय झाला आहे. मात्र निवडणूक बिनविरोध न केल्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला असून भाजपचे (BJP) चार उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकाीत महाविकास आघाडीच्या पॅनलचे 17 उमेदवार निवडून आले असून भाजप प्रणित पॅनलचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जतचे आमदार विक्रम सावंत (Congress MLA Vikram Sawant) यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे.

करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा

आमदार विक्रम सावंत यांच्या विरोधात जत तालुक्यातील मंत्री जयंत पाटील यांचे समर्थक बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे हे भाजपप्रणीत शेतकरी विकास पॅनलमधून उमेदवार होते. जयंत पाटील यांच्या समर्थकाने आमदार विक्रम सावंत यांचा पराजय केल्यामुळे जिल्हाभर जयंत पाटील यांनीच विक्रम सावंत यांचा 'करेक्ट' कार्यक्रम केला असल्याची चर्चा आहे.

पाच मतांनी पराभव

या निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांचा पराभव झाला आहे. भाजपचे प्रकाश जमदाडे यांनी आमदार विक्रम सावंत यांचा पराभव केला आहे. प्रकाश जमदाडे यांना 45 मते मिळाली तर आमदार विक्रम सावंत यांना 40 मते मिळाली.

वाचा : आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव

विश्वजीत कदम गटाला धक्का

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रम सावंत यांचा 5 मतांनी पराजय झाला आहे. काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या गटाला हा धक्का मानला जात आहे.

कुठल्या पक्षाने किजी जागा जिंकल्या?

राष्ट्रवादी काँग्रेस - 9

काँग्रेस - 5

भाजप - 4

शिवसेना - 3

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल

मिरज सोसायटी गट

विशाल दादा पाटील (आघाडी) 52 विजयी

उमेश पाटील (भाजप) 16

आटपाडी सोसायटी गट

तानाजी पाटील (आघाडी) 40 विजयी

राजेंद्रअण्णा देशमुख (भाजप) 29

कडेगांव सोसायटी गट

मोहनराव कदम (आघाडी) 53 विजयी

तुकाराम शिंदे (भाजप) 11

तासगाव सोसायटी गट

बी. एस. पाटील (आघाडी) 41 विजयी

सुनील जाधव (भाजप) 22

ऍड. प्रताप पाटील (अपक्ष) 15

वाळवा सोसायटी गट

दिलीप तात्या पाटील (आघाडी) 108 विजयी

भानुदास मोटे (भाजप) 23

कवठेमंकाळ सोसायटी गट

अजितराव घोरपडे (आघाडी) 54 विजयी

विठ्ठल पाटील (अपक्ष) 14

वाचा : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव

जत सोसायटी गट

प्रकाश जमदाडे (भाजप) 45 विजयी

विक्रमसिंह सावंत (आघाडी) 38

महिला राखीव गट

अ जयश्रीताई पाटील (आघाडी) 1688 विजयी

ब अनिता सगरे (आघाडी) 1408 विजयी

संगीता खोत (भाजप) 579

दिपाली पाटील (भाजप) 405

अनुसूचित जाती गटात

महाआघाडीचे विद्यमान संचालक

बाळासो होनमोरे 1503-548 मतानी विजयी.

भाजपचे रमेश साबळे पराभूत.

ओबीसी गटात

महाविकासआघाडीचे मन्सूर खतीब 1395 मते मिळवून विजयी.

भाजपचे रवि तम्मणगौडा यांना 772 मते मिळाली.

विकास महाआघाडीचे चिमण डांगे विजयी

महाआघाडीचे वैभव शिंदे विजयी

First published:

Tags: Election, Sangli, काँग्रेस