मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आयजी वळू हटावं, सांगलीत विश्वास नांगरे पाटलांविरोधात आंदोलन

आयजी वळू हटावं, सांगलीत विश्वास नांगरे पाटलांविरोधात आंदोलन

14 नोव्हेंबर : सांगली अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी राष्ट्रविकास सेना आणि दलित महासंघानं पोलिसांविरोधात आंदोलन केलं. आंदोलकांनी वळूवर आयजी हटावं असं लिहून वळूला पोलीस ठाण्यात सोडून दिलं. अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी सांगली बंदनंतर आज  राष्ट्र विकास सेने आणि दलित महासंघाने पोलिसांच्या विरोधात आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये वळू सोडला आणि या वळूवर आयजी हटाव असं लिहिलं होतं. तसंच सांगली पोलीस सुस्त झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अधीक्षक दत्तात्रेय शिंदे आणि दीपाली काळे यांना निलंबित करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली.
First published:

Tags: अनिकेत कोथळे, विश्वास नांगरे पाटील, सांगली

पुढील बातम्या