सांगली, 31 ऑगस्ट : सांगली जिल्ह्यातील मिरज येथील बँक ऑफ बडोदा बँकेला मोठा फटका बसला आहे. कंपनीच्या एका व्यवस्थापकाने तब्बल 17 कोटींना गंडा घातला आहे. (Sangli Crime Fraud) शेतकऱ्यांकडून घेतलेला माल तारण ठेवल्याचे सांगून बँकेला कोट्यावधी रूपयांना त्याने फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोडीटी नेक्स्ट कार्पोरेशन लि. मुंबई या कंपनीचा माजी एरिया व्यवस्थापक अजित नारायण जाधव याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्याला पोलिसांनी 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेला माल मिरज येथील बँक ऑफ बडोदा शाखेत तारण ठेवला. त्यानंतर त्या मालाची परस्पर विक्री करून बँकेची 16 कोटी 97 लाख रुपये फसवणूक केल्याप्रकरणी मोडीटी नेक्स्ट कार्पोरेशन लि. मुंबई या कंपनीचा माजी एरिया व्यवस्थापक अजित नारायण जाधव याला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई झाली. त्याला न्यायालयाने पाच सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.
हे ही वाचा : शहरातील कोणतेही पोलीस ठाणे उडवून टाकणार औरंगाबाद पोलिसांना आलेल्या फोनमुळे खळबळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हा दोन वर्षांपूर्वी कंपनीचा एरिया मॅनेजर होता. त्याने मिरज तालुक्यातील 46 शेतकऱ्यांकडून शेतमाल घेऊन ठेवला होता. तो माल त्याने बँक ऑफ बडोदा बँकेत तारण ठेवून त्याची परस्पर विक्री केली. ही घटना मार्च 2017 ते नोव्हेंबर 2020 मध्ये घडली.
फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेतकऱ्यांच्या नावे काढलेले कर्ज थकीत ठेवून बँकेबरोबर केलेल्या कराराचा भंग करून बँकेची 16 कोटी 97 लाख रुपयांची फसवणूक केली. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. जाधव यास मुंबई येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. दरम्यान याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. सांगली जिल्ह्यात अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.
हे ही वाचा : धक्कादायक! वानराने महिलेला विहिरीत ढकललं, परिसरात खळबळ
सांगलीत फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
सांगलीतील हळद व्यापाऱ्याने ४० शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आल्यानंतर आता वाई तालुक्यातील खानापूर येथील १५ शेतकऱ्यांची तब्बल २० लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात संबंधित व्यापारी आणि त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Sangli, Sangli (City/Town/Village), Sangli news