सांगली, 19 ऑगस्ट : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात सासच्यांनी जावयाला जिवे मारल्याची घटना समोर आली आहे. (Sangli crime) पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. सांगली जिल्ह्यातील बोरगाव (ता. वाळवा) येथील विजय तानाजी जाधव (वय 35, रा. शिवाजीनगर) या जावयाचा उपचारादरम्यान गुरुवारी काल (दि.18) मृत्यू झाला.
दरम्यान विजय यांच्यावर मागच्या 18 दिवसांपूर्वी मारहाण झाली होती. मारहाणीचा हा प्रकार शनिवार, (दि. 30) जुलै रोजी घडला होता. जाधव यांच्यावर कराड येथे उपचार सुरू होते. याप्रकरणी विजय यांचे सासरे मधुकर आनंद कवठेकर, सासू राजश्री, मेहुणा प्रशांत (सर्व रा. शिवाजीनगर) यांच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान विजय यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
हे ही वाचा : 'माझ्याकडे काय बघतो पैसे काढ', बंदुकीचा धाक दाखवून युवकाचं अपहरण
विजय यांच्या आई कलाबाई यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विजय हे बोरगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांची सासरवाडी घराशेजारील आहे. विजय व त्यांच्या पत्नी यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वादावादी होत होती. शनिवारी विजय व त्यांच्या पत्नीमध्ये भांडण झाल्याने त्या माहेरी गेल्या होत्या. दुपारी विजय हे पत्नीला आणण्यासाठी सासरच्या घराकडे गेले होते. त्यावेळी सासू राजश्री, सासरे मधुकर, मेहुणा प्रशांत आणि विजय यांच्यामध्ये वादावादी झाली. तिघांनी विजय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
हे ही वाचा : Kolhapur Crime : कोल्हापूरात गँगवॉर, वाढदिवसाचे फलक फाडल्याचा जुन्या वादातून पेट्रोलने घरच पेटवले
'तू माझ्या बहिणीला सारखा त्रास देतोस काय? तुला आता जिवंत ठेवत नाही', असे म्हणत प्रशांत याने लाकडी दांडके विजय यांच्या डोक्यात मारले. या मारहाणीत विजय हे गंभीर जखमी झाले. डोक्याला गंभीर मार लागल्याने विजय यांना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Sangli, Sangli (City/Town/Village), Sangli news