मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लाट कायम!, सांगलीत 'कमळ' उमललं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं स्वप्न भंगलं

लाट कायम!, सांगलीत 'कमळ' उमललं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं स्वप्न भंगलं

सांगली मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता राखत दणदणीत विजय मिळवलाय.

सांगली मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता राखत दणदणीत विजय मिळवलाय.

सांगली मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता राखत दणदणीत विजय मिळवलाय.

सांगली, 3 ऑगस्ट : जळगाव पाठोपाठ सांगलीही भाजपसाठी चांगली ठरली आहे. सांगली मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता राखत दणदणीत विजय मिळवलाय. अटीतटीच्या लढतीत शेवट्या क्षणापर्यंत चुरस कायम होती अखेर भाजपने 41 जागा जिंकत महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावलाय. सांगली महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने एकहाती सत्ता राखली. सांगली महापालिकेत सत्ताधारी काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत एकत्र येत निवडणूक लढवली. काँग्रेसने 44 तर राष्ट्रवादीने 34 अशा 78 जागावर उमेदवार मैदानात उतरवले. तर भाजपने स्वबळावर 78 उमेदवार जाहीर केले. आज सकाळी मजमोजणीला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी घेतली. दुपारपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर कायम होती. त्यामुळे पुन्हा आघाडीची सत्ता येईल अशी चर्चा सुरू झाली. पण, दुपारनंतर अचानक चित्र बदलले. भाजपने आधी एका जागेनंतर दोन, म्हणत मोठी आघाडी घेतली आणि काँग्रेस आघाडीला मागे टाकलं. भाजपने सर्वाधिक 41 जागा जिंकत बहुमताचा जादुई आकडा पार केला. तर सत्ताधारी काँग्रेसला 20 तर राष्ट्रवादीला 15 जागांवर समाधान मानावे लागले. आघाडीला मिळून 35 जागा वाट्याला आल्यात. तर एकट्या भाजपने 41 जागा मिळून पालिकेवर झेंडा फडकावला. सांगली पालिकेवर याआधी तीन वेळा काँग्रेसने सत्ता गाजवली. तर एकावेळी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेऊन सत्ता स्थापन केली होती. मात्र, पहिल्यांदाच भाजपने एकहाती सत्ता राखली. भाजपच्या या अनपेक्षीत यशामुळे कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला एकच उधाण आलंय. Thanks जळगाव आणि सांगलीकर - मुख्यमंत्री राज्यात आरक्षणासाठी मराठा आंदोलनानं उग्ररुप धारण केलेलं असतानाही जळगाव आणि सांगलीकरांनी भाजपवर विश्र्वास दाखवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानलेत. मराठा समाजाच्या मागण्या अगदी न्यायपूर्वक आहेत. त्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असल्या तरी त्याच आम्हीच पूर्ण करू असा जनतेला विश्वास आहे. आणि यामुळेच दोन्ही जिल्ह्यातील जनतेने महापालिका निवडणुकीत भाजपला कौल दिला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. या निवडणुकीसाठी जळगांवचे गिरीश महाजन, एकनाथ खडसे आणि सुभाष देशमुख, चंद्रकांत पाटील या सर्वांनी मेहनत घेतली असल्याचं ते म्हणाले. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अवघा महाराष्ट्र पेटून उठला. या संपूर्ण आंदोलनात सत्ताधारी भाजपची दमछाक करण्यात आली. सरकावर ताशेरे ओढण्यात आले पण तरी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सांगली आणि जळगाव महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकावला आहे. दोन्ही जागांवर तब्बल 35 वर्षांनंतर भाजपने विजय मिळवला आहे. अर्थात याचा फायदा फडणवीसांना भाजपची मुळं मजबुत करण्यासाठी होणार आहे. सध्या सांगली आणि जळगावमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू आहे. खरंतर सांगली आणि जळगाव महानगरपालिका निवडणुक ही फडणवीस सरकारसाठी प्रतिष्ठेची अशी होती. आणि ती प्रतिष्ठा राखण्यासाठी ते यशस्वीही झाले आहेत. या दोन्ही नगरपालिका भाजपने अनेक वर्षानंतर जिंकल्या आहेत. तेही अशा वातावरणात जेव्हा मराठा समाजाने भाजप विरोधात तीव्र आंदोलनं केली. जळगाव महानगरपालिका निकाल भाजपने 36 वर्षांनंतर स्वत:च्या हिंमतीवर जळगावमध्ये विजय मिळवला आहे. जळगावात आतापर्यंत सुरेशदादा जैन यांच्या खानदेश विकास पार्टींचं राज्य होतं. पण आता भाजपने 75 पैकी 57 जागावंर विजय मिळवला आहे. जळगावात नाराज मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपचा एकदाही प्रचार केली नाही तरीदेखील भाजपने आपला गड राखला. भाजपशी वेगळं होत जैन यांच्यासोबत लढत असलेल्या शिवसेनेला फक्त 15 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर खातही खोलू शकली नाही. हेही वाचा Jalgaon Election 2018: गुरू सुरेशदादांवर भारी पडला शिष्य Jalgaon Election 2018: ४० वर्षांनंतर सुरेशदादांच्या गडाला सुरंग Jalgaon Election 2018: जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ Jalgaon Corporation election 2018 : जळगावात 'कमळ' उमललं, सुरेशदादांना धक्का

LIVE : सांगलीच्या निकालात टि्वस्ट, काँग्रेस-राष्ट्रवादीला मागे टाकत भाजपची आघाडी

जळगावात ओवेसींची एंट्री, एमआयएमने जिंकल्या 3 जागा  
First published:

Tags: BJP, Congress, Counting, Election, Municipality, Of Sangli, Of votes, Sangali, Sangali election, Sangali news, Sangali voting, Sangli election 2018, Sangli municipal corporation election 2018, Shivsena, भाजप

पुढील बातम्या