मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णाचं गाव केलं सील, कुटुंबातील पाच जणांना हलवलं रुग्णालयात

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णाचं गाव केलं सील, कुटुंबातील पाच जणांना हलवलं रुग्णालयात

संबंधित रुग्ण मुंबईत असून त्याच्यावर तेथे उपचार सुरु आहेत. यादरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली.

  • Share this:

सांगली, 12 एप्रिल: सांगली जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना वाळवा तालुक्‍यातील रेठरेधरण येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित रुग्ण मुंबईत असून त्याच्यावर तेथे उपचार सुरु आहेत. यादरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली.

संबंधित रुग्ण काही दिवसांपूर्वी रेठरेधरण या गावात राहून गेला होता. खबरदारीचा भाग म्हणून वाळवा तालुका प्रशासनाने रेठरेधरण हे संपूर्ण गावच सील केलं आहे. त्याचबरोबर तातडीने अन्य उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील पाच जणांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा.. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला जिवंत जाळलं, पेटत्या पत्नीनेच पतीला मारली मिठी

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोरोनाबाधित 65 वर्षीय रुग्ण मार्च महिन्यात 20 तारखेला मुंबईहून रेठरेधरण येथे आले होते. ते जवळपास 20 दिवस गावातच राहिले होते. त्यांना काही व्याधी आहेत. रेठरेधरण येथील वास्तव्यात हा त्रास अधिक जाणवू लागल्यावर 10 एप्रिलच्या दरम्यान ते रुग्णवाहिकेतून मुंबईला परत गेले. त्यांच्यावर मुंबई येथील अपोलो रुग्णालयात नियमित उपचार सुरु असल्याने त्यांना तिकडे हलविण्यात आले होते. दरम्यान, त्यांना सर्दी, खोकला हा त्रास जाणवू लागल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. आता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा...अवघ्या 4 दिवसांत 80 जिल्ह्यांत पोहोचला कोरोना, अर्ध्या भारतात फैलाव

गावाकडे मुलगा, सून व नातवंडे आहेत. अधूनमधून ते गावाकडे येतात. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचा फोन आज त्यांना मुंबईहून येताच तालुका प्रशासन सावध झालं आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First Published: Apr 12, 2020 11:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading