काँग्रेसमध्ये खळबळ, आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

काँग्रेसमध्ये खळबळ, आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

मोहनराव कदम हे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे भाऊ आहेत.

  • Share this:

सांगली, 15 ऑगस्ट : राज्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. कोरोनाच्या या जीवघेण्या महामारीने अनेक दिग्गजांनाही वेढलं आहे. राज्यात अनेक राजकीय मंत्र्यांच्या घरी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आज काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार मोहनराव कदम हेदेखील कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती देण्यात आली आहे. मोहनराव कदम यांची रॅपिड कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात येत आहे.

मोहनराव कदम हे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे भाऊ आहेत. सांगलीमध्ये कोरोनाच्या संकटात काम करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. कदम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर मोहनराव यांच्या कुटुंबियाचीही कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. कदम यांच्या संपर्कात कोण-कोण आलं होतं यासाठी तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पार्थ अजूनही शांतच, श्रीनिवास पवारांच्या घरी पोहोचला पण...

दरम्यान, सेलिब्रिटींपासून ते अन्य राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे सहकार मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थितीत होते.

सातारा जिल्ह्याभोवती कोरोनाचा वाढता विळखा लक्षात घेता येथील यंत्रणेवर दिवसागणिक ताण हा वाढताना दिसत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे या परिस्थितीत सगळ्या यंत्रणेवर लक्ष ठेऊन यातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

भारतीयांसाठी चिंतेची बाब, दर 4 मिनिटांनी लोक का संपवतात आपलं आयुष्य?

धक्कादायक म्हणजे, काही दिवसांपूर्वी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी या बैठकीला बाळासाहेब पाटील सुद्धा हजर होते. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी, शासकीय अधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 15, 2020, 5:38 PM IST

ताज्या बातम्या