News18 Lokmat

अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न

सांगली शहर पोलीस स्टेशन समोरच्या चौकात अनिकेतच्या भावांनी अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केलाय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2017 04:05 PM IST

अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न

 

28 नोव्हेंबर : अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी अनिकेतच्या भावाने आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी लगेल ताब्यात घेतल्यामुळे पुढचा अनर्थ टळलाय.

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सांगलीचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांची बदली करण्यात आलीये. या प्रकरणी या दोघांची चौकशी सुरू होती. राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी बदल्यांचे आदेश जारी केले. दत्तात्रय शिंदे यांची नागपूरला तर दीपाली काळे यांची सोलापूरला बदली करण्यात आलीय. मात्र, अजून हवा तसा तपास झाला नाही अशी नाराजी कोथळे कुटुंबियांनी व्यक्त केलीये. सांगली शहर पोलीस स्टेशन समोरच्या चौकात अनिकेतच्या भावांनी अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केलाय. अनिकेतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणी अनिकेतच्या भावांनी केलीये. पोलिसांनी वेळीच दोघांना ताब्यात घेतलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 04:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...