मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेततळ्यात पडून 2 बालकांचा मृत्यू; सांगलीतील हृदयद्रावक घटना

शेततळ्यात पडून 2 बालकांचा मृत्यू; सांगलीतील हृदयद्रावक घटना

2 childrens died in Sangli: सांगलीत शेततळ्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

2 childrens died in Sangli: सांगलीत शेततळ्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

2 childrens died in Sangli: सांगलीत शेततळ्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

आसिफ मुरसल, प्रतिनिधी

सांगली, 10 जून: सांगलीच्या तासगाव तालुक्यातील (Tasgaon Tehsil Sangli) आरवडे (Aarvade) येथे घराच्या मागे असणाऱ्या शेततळ्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू (2 childrens drown) झाला आहे. शौर्य संजय मस्के (वय 6 वर्षे) आणि ऐश्वर्या आप्पासो आवटी (वय 8 वर्षे) या दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

आरवडे-गोटेवाडी रोडलगत असणाऱ्या मस्के वस्ती येथे आपल्या घराबाहेर शौर्य आणि ऐश्वर्या नेहमीप्रमाणे खेळत होती. सायंकाळी दोघेही दिसेनासे झाल्याने कुटुंबीयांनी आसपासच्या घरामध्ये शोधायला सुरवात केली. मात्र ते दोघे सापडले नाहीत. त्यानंतर घरामागे असणाऱ्या शेततळ्या जवळ शोधायला गेले असता शेततळ्यावर मोबाइल दिसला.

पाण्यामध्ये घसरून पडल्याचा अंदाज व्यक्त करत तरुणांनी पाण्यात उड्या टाकत चिमुकल्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी शेततळ्याच्या तळभागात दोघेही आढळून आले. तात्काळ त्यांना पाण्याबाहेर काढून तासगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मुसळधार पावसात दहिसरमध्ये 3 घरे कोसळली, एकाचा मृत्यू

यापैकी ऐश्वर्या ही माधवनगर येथील नातेवाईकांच्या घरातून आरवडे येथे काही दिवसांपूर्वी आली होती. घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणार होता. शौर्य हा आई- वडिलांना एकुलता एक होता तर ऐश्वर्या हिला 2 लहान भाऊ आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

जळगावात वीज कोसळून दोघांचा मृत्यू

बुधवारी सायंकाळी शेतातून घरी परतत असताना अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेल्या तळई गावात ठरावीक अंतराने या दोन दुर्दैवी घटना घडल्या. मृतांमध्ये तरुणासह प्रौढाचा समावेश आहे. भूषण अनिल पाटील (वय 18) आणि विक्रम दौलत चौधरी (वय 57) अशी मृतांची नावे असून, दोघेही तळई गावातील रहिवासी होते.

विक्रम चौधरी व भूषण पाटील हे दोघे जण शेतात गेलेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तळई शिवारात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ते घरी परत येत होते. अंगावर वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या. त्यामुळे तळई गावावर एकच शोककळा पसरली आहे.

First published:
top videos

    Tags: Sangli