हरिष दिमोटे, संगमनेर, 4 फेब्रुवारी : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी काल सोमवार सकाळपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निकृष्ट अन्न मिळत असल्याने विद्यार्थी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. वस्तीगृहातील सुमारे 250 मुले अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले आहेत.
राजूर येथील प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे हे आज मुलांशी चर्चा करण्यासाठी वसतीगृहात आले. मात्र संतप्त झालेल्या मुलांनी त्यांच्यासोबत चर्चा करण्यास नकार दिला. मुलांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने ठुबेंना काढता पाय घ्यावा लागला. संतप्त विद्यार्थ्यांनी वसतीगृहातील गेटला टाळे ठोकले आहे.
हिरव्या आणि तेलाच्या पावसानंतर डोंबिवलीत आता चक्क गुलाबी रस्ता
नाशिक आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त गिरीश सरोदे ,आमदार सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परंतु त्या बैठकीतही ठोस आश्वासन न मिळाल्याने विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. अकोलेचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही आंदोलनास पाठिंबा दर्शवत ठेकेदार पद्धतीत सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
धक्कादायक: उच्चभ्रू सोसायटीत भामटा करता होता लहान मुलांसोबत लैंगिक चाळे
दरम्यान, विद्यार्थी गेल्या 24 तासांहून अधिक काळापासून अन्नत्याग आंदोलन करत असल्याने त्यांच्या प्रकृतीचा प्रश्न तयार होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वसतीगृह प्रशानाने ताबोडतोब याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.