संगमनेर, 11 मे: एकीकडे कोरोनाचं (coronavirus) संकट असताना भोंदूबाबा देखिल नागरिकांमधील अंधश्रद्धेचा (Superstition) गैरफायदा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. संगमनेरच्या (Sangamner) पारेगाव बुद्रूक या गावात एक असाच प्रकार घडला आहे. याठिकाणी भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली एका मांत्रिकानं (exorcist) महिलेवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिकाला अटक करून कारवाई सुरू केली आहे.
(वाचा-मित्रच निघाला वैरी! जुन्या वादातून तरुणाची हत्या; नांदेडमधील मन हेलावणारी घटना)
संगमनेर तालुक्यामध्ये पारेगाव बुद्रुक गावातील महिलेवर अत्याचाराचा हा प्रकार घडला आहे. गावातील एका महिलेला गेल्या अनेक दिवसांपासून काही त्रास होत होते. पण डॉक्टरांकडून योग्य उपचार घेण्याऐवजी अंधश्रद्धेला बळी पडत ते एका भोंदूबाबाकडे गेले. सावित्रा गडाख या भोंदूबाबाने महिलेला तुझ्यावर भूतबाधा झाली आहे. तुझ्या अंगातलं भूत काढावं लागेल असं या महिलेला सांगितलं. महिलेनंही त्या मांत्रिकावर विश्वास ठेवत खरंच आपल्याला भूतबाधा झाली आहे, यावर विश्वास ठेवला.
(वाचा-18 वर्षीय तरुणाने स्टेटसला VIDEO ठेवून नदीपात्रात घेतली उडी, कल्याण हादरलं!)
मांत्रिकानं सांगितल्याप्रमाणं महिला पतीला सोबत घेऊन मांत्रिकाकडे भूतबाधा उतरवण्यासाठी गेली. पण या मांत्रिकाने महिलेला बळजबरी दारू पाजली. त्यानंतर तिला शेतामध्ये नेत तिच्यावर अत्याचार केला. या सर्व प्रकारानंतर महिलेनं या मांत्रिकाच्या विरोधात संगमनेर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधत कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे.
समाजातील अशा अनिष्ठ गोष्टी बंद व्हाव्यात यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समिती कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. पण प्रत्यक्ष नागरिक जोपर्यंत याबाबत विचार करून यातून बाहेर निघत नाहीत, तोपर्यंत अशा भोंदूबाबांचं फावत राहणार हे नक्की.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Coronavirus, Crime news, Maharashtra