लढत विधानसभेची : बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखे-पाटलाचं आव्हान

बाळासाहेब थोरात यांचे कट्टर विरोधक राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले. त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं. या विधानसभा निवडणुकीतही या दोघांमधला सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2019 08:17 PM IST

लढत विधानसभेची : बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखे-पाटलाचं आव्हान

अहमदनगर, 18 सप्टेंबर : काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या 6 निवडणुकांमध्ये बाळासाहेब थोरात यांनी इथून विजय मिळवला आहे. बाळासाहेब थोरात यांचे कट्टर विरोधक राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले. त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं.

या विधानसभा निवडणुकीतही या दोघांमधला सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतो. इथे लोकसभेत युतीला मतं मिळत असली तरी विधानसभेत मात्र मतदार बाळासाहेब थोरात यांनाच पसंती देतात.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही बाळासाहेब थोरात यांनी मोठं मताधिक्य मिळवत शिवसेनेचे जनार्दन आहेर यांचा पराभव केला. आता या निवडणुकीत ते ही विजयी परंपरा कशी राखतात ते पाहावं लागेल.

लढत विधानसभेची : खेड-आळंदीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये लढत

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष असलेले सत्यजीत तांबे हे ही संगमनेरचेच. एवढंच नाही तर सत्यजीत तांबे हे बाळासाहेब थोरातांचे भाचे आहेत. सध्या काँग्रेसची राज्यातली मोठी पदं या मामा-भाच्यांकडे आहेत. असं असलं तरी यावेळी बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आता भाजपत गेलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचं आव्हान आहे.

Loading...

युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. इथे जनार्दन आहेर, नाना थोरात, राजेश चौधरी यांच्यासह अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राधाकृष्ण विखे पाटील भाजपात आल्याने हा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे युतीच्या समीकरणांवर इथली उमेदवारी अवलंबून आहे.

2014 विधानसभा निवडणुकीतलं मतदान

बाळासाहेब थोरात (काँग्रेस) 1 लाख 3 हजार 564

जनार्दन आहेर (शिवसेना) 44 हजार 759

राजेश चौधरी (भाजप) 25 हजार 07

=====================================================================================

VIDEO मुख्यमंत्र्यांना कोण खोटं बोलायला लावतंय?आदित्य ठाकरेंनी केला हा गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...