धक्कादायक! प्रेमातून तरुणानं उचललं धक्कादायक पाऊल

धक्कादायक! प्रेमातून तरुणानं उचललं धक्कादायक पाऊल

कोरोनाच्या काळात संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर गावात एका तरुणानं आयुष्य संपवलं आहे.

  • Share this:

संगमनेर, 09 ऑगस्ट : कोरोनाच्या काळात संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर गावात एका तरुणानं आयुष्य संपवलं आहे. धक्कादायक बाबा म्हणजे प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. योगेश सायबंदे असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव असून विषारी औषध घेऊन या तरुणानं आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 6 ऑगस्टला योगेशचा मृतदेह चुलत्यांच्या विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याच्या हातात विषारी औषधाची बाटली होती आणि बेशुद्ध अवस्थेत योगेश होता. स्थानिकांनी त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत योगेशचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

हे वाचा-SSR Death Case: वाद पेटला! बिहारचा FIR राजकीय हेतूने, मुंबई पोलिसांचा आरोपेहमग

अल्पवयीन मुलीच्या लग्नाची माहिती प्रेमातून योगेश पोलिसांना देईल या भीतीनं मुलीच्या नातेवाईकांनी त्याला दमदाटी करून मारहाण केली होती. मृत योगेश सायबंदे या तरुणाला प्रेमप्रकरणात मुलीकडच्यांनी वारंवार दमदाटी करून धमकी दिली वेळप्रसंगी मारहाण देखील केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणाला बेदम मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईक आणि मित्र परिवारानं केला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौकशीसाठी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात एक आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 9, 2020, 8:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading