रक्षकच झाले भक्षक,कोठडीत मृत्यू झालेल्या आरोपीचा मृतदेह जाळला

रक्षकच झाले भक्षक,कोठडीत मृत्यू झालेल्या आरोपीचा मृतदेह जाळला

धक्कादायक बाब म्हणजे एकदा मृतदेह जळला नाही म्हणून दुसऱ्यांदा जाळण्यात आला.

  • Share this:

आसिफ मुरसल,सांगली

08 नोव्हेंबर : सांगलीत पोलिसांनीच एका आरोपीची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना उघडकीला आलीये.

फोटोतला हा तरुण अनिकेत कोथले आज या जगात नाही. त्याचा खून केलाय. हा खून दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही, हा खून पोलिसांनी केलाय. सांगलीतल्या विश्रामबाग पोलिसांनी चोरीप्रकरणात अनिकेतला पकडलं होतं. पोलीस कोठडीत केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अनिकेत कोठडीतून पळून गेल्याचा बनाव केला. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यानं अनिकेतचा मृतदेह थेट आंबोलीत नेऊन जाळला. धक्कादायक बाब म्हणजे एकदा मृतदेह जळला नाही म्हणून दुसऱ्यांदा जाळण्यात आला. अनिकेतच्या कुटुंबीयांना हा प्रकार संशयास्पद वाटला त्यांनी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केलं.

हे प्रकरण पोलिसांनाही संशयास्पद वाटल्यानंतर त्याचा तपास केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी या प्रकरणात सहा आरोपींना अटक केलीये.

या प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास व्हावा यासाठी सीआयडीकडे तपास वर्ग करण्यात येणार आहे. जेव्हा कायद्याचे रक्षकच भक्षक बनतात तेव्हा विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न निर्माण होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 08:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading