Home /News /maharashtra /

पोलिसांची मदत करणाऱ्या शिक्षकाला ट्रकने चिरडलं, जागीच ठार

पोलिसांची मदत करणाऱ्या शिक्षकाला ट्रकने चिरडलं, जागीच ठार

चेक पोस्टवरुन पळालेल्या भरधाव ट्रक चालकाने अंगावर ट्रक घालून शिक्षकाला चिरडले आहे.

सांगली, 12 मे : पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतीस म्हणून ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाला चेक पोस्टवरुन पळालेल्या भरधाव ट्रक चालकाने अंगावर ट्रक घालून चिरडले आहे. यात मदतनीस शिक्षक जागीच ठार झाला. नानासाहेब सदाशिव कोरे असं मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकांचं नाव आहे. सांगली जिल्ह्यातील डफळापूर ता. जत नजिकच्या चेकपोस्टवर हा शिक्षक पोलिसांना मदतनीस म्हणून कार्यरत होता. डफळापूर स्टँडनजिक मंगळवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास ही ह्रदयद्रावक घटना घडली. शिंगणापूर नजिकच्या आंतराष्ट्रीय चेक नाक्यावर हा शिक्षक नियंत्रण कर्मचारी म्हणून सोमवारी रात्रीच्या ड्युटीवर होता. त्याचवेळी सिमेंट भरलेला ट्रक कर्नाटकातून जतकडे निघाला होता. घटनेनंतर हणमंत रामचंद्र मुरड (वय 37,रा.नाथाचीवाडी ता.दौंड जि.पुणे), (ट्रक नं.एम एच 12 एल डी 9749) पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अथनीकडून ट्रक चालक ट्रक घेवून आला असता त्याला तिथं ड्युटीवर असणारे शिक्षक नानासो सदाशिव कोरे वय 35 रा. डफळापुर ता. जत यांनी ट्रकला थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने ट्रक थांबवला तर नाहीच, पण शिक्षक कोरे यांना शिवीगाळ करून तिथून पोबारा केला. ट्रक थांबवण्यासाठी ऑपरेटर चौगले व कोरे यांनी ट्रकचा डफळापूरपर्यंत पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी गाडी ट्रकच्या पुढे काढून गाडी बाजूला लावली आणि ट्रक थांबवण्याची विनंती केली. मात्र ट्रक चालकाने ट्रक न थांबवता शिक्षक कोरे यांना ट्रकने चिरडले. यात कोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा डुबुले, डीवायएसपी दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक राजाराम शेळके घटनास्थळी दाखल आहेत. पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Sangali

पुढील बातम्या