सांगली, 07 जून : पावसाळा सुरू झाल्यामुळे गावकऱ्यांना आता मासेमारीची ओढ लागली आहे. मात्र, सांगलीमध्ये (Sangali) मासेमारीमुळे एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन सख्खा भावांचा आणि एका चुलत भावा तलावात बुडून दुर्दैवी अंत झाला. आज तिघांपैकी एकाचा मृतदेह हाती लागले.
टेंभू योजनेचे पाणी घाणंद तलावात आले आहे. तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहत होते. सांडव्यातून बाहेर पडलेले पाणी कालव्यातून आटपाडीकडे येते. तिथे लगतच अंकुश व्हनमाने आणि लहू व्हनमाने या दोन सख्ख्या भावाची शेत जमीन आहे. लगतच कालव्यातून पाणी वाहत जाते.
इंग्लंडमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा रेकॉर्ड, 0 रनमध्ये गमावल्या 4 विकेट्स
नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी तीन वाजता घरातील कुत्रे सोबत घेऊन मासेमारीसाठी विजय अंकुश व्हनमाने, आनंदा अंकुश व्हनमाने, हे सख्खे भाऊ आणि त्यांचा चुलत भाऊ वैभव लहू व्हनमाने गेले होते. सायंकाळी सहा पर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली.
रात्री आठ वाजता घाणंद तलावातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्या लगत विजय आणि आनंदा यांची कपडे आणि चप्पला सापडल्या. त्यांच्या सोबत नेलेल्या कुत्र्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात सापडला. तर वैभव याची काहीच माहिती लागली नाही. गावकऱ्यांनी आटपाडी पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती कळवली.
रात्री साडेआठ वाजता घटनास्थळी तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बराच वेळ शोधाशोध केली मात्र पाण्याचा प्रवाह जादा असल्याने मुलांचा तपास लागला नाही. सांगलीहून मुलांचा पाण्यात शोध घेण्यासाठी पाणबुडी दाखल झाल्या होत्या. अंधारातच पाणबुडयानी मुलांचा शोध सुरू केला होता. या घटनेने गावात आणि तालुक्यात खळबळ उडाली.
आज सकाळी रेस्क्यू टीमने जोरदार शोध मोहीम सुरू केली आहे. तीन भावा पैकी वैभव व्हनमाने या चुलत भावाचा मृतदेह सापडला आहे. तर अंकुश व्हनमाने आणि लहू व्हनमाने हे दोन सख्खे भावाचे मृतदेह अद्याप सापडले नाही. सकाळ पासून पोलीस , रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मात्र या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.