2 दिवस पाणी असल्यावरच मदत देण्याच्या निर्णयावर CM यांचं स्पष्टीकरण, 15 ठळक मुद्दे

2 दिवस पाणी असल्यावरच मदत देण्याच्या निर्णयावर CM यांचं स्पष्टीकरण, 15 ठळक मुद्दे

पूरपरिस्थितीबाबत आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

  • Share this:

सांगली, 10 ऑगस्ट : सांगली आणि कोल्हापूरमध्ये झालेल्या भीषण पूरपरिस्थितीबाबत आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. 'आता कुठेही धोक्याची परिस्थिती नाही. बचावकार्य वेगात सुरू असून लवकरच सर्वांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात येईल,' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सरकारने पूरग्रस्तांना मदत करताना काल एक अध्यादेश काढला होता. जर 2 दिवस घर पाण्यात असेल तरच 10 किलो तांदूळ आणि गहू मिळेल, असं या अध्यादेशात म्हटलं होतं. याबाबत सरकारवर मोठी टीका झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे. 'याआधी 2014 साली काढण्यात आलेल्या अध्यादेशात सात दिवसांची मर्यादा होती ती आम्ही दोन दिवसांवर आणली,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

-सांगलीमध्ये 93 बोटी काम करत आहेत

-101 गावांतून 28 हजार 537 कुटुंब विस्थापित झाली आहेत

-एकूण 1 लाख 43 हजार लोक विस्थापित झाले

-35 हजार जनावरे कॅम्पमध्ये

-ब्रम्हनाळ मध्ये झालेली घटना वगळता कुठलेही जीवितहानी नाही

-अनेक राज्यातून बचाव पथकं दाखल

-कोयनेत 9 दिवसात 50 टीएमसी पाणी गोळा झालं. त्यामुळे विसर्ग वाढवण्याशिवाय पर्याय नाही

-पहिले दोन दिवस पाणी वाढत नव्हतं, पण नंतर अचानक पाणी वाढलं

-9 दिवसात कोयना धरण 50 टक्के भरलं

-आज नौदलाच्या 15 तुकड्या विशाखापट्टणमहून 2005 च्या पूरकाळापेक्षा यंदाच्या पूरकाळात 3 पट जास्त पाऊस पडला आहे

-आपल्याकडे पाऊस नेमका किती आणि कधी पडणार याची ठोस माहिती सांगणारी यंत्रणा नाही

-हवामान बदलाच्या संकटामुळं अतिवृष्टी आणि पूरसंकट

-जिल्हास्तरावर आपत्कालीन स्थिती सुधारू

-कर्नाटकचे 120 लोक आपण वाचवले

-आपत्कालीन परिस्थितीत राजकारण करू नये, कमतरता दाखवा सुधार करू

SPECIAL REPORT: आधी अन्नासाठी तडफड आणि आता पुरग्रस्तांसमोर रोगराईचं संकट!

Published by: Akshay Shitole
First published: August 10, 2019, 3:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading