Home /News /maharashtra /

सांगली : हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा मृत्यू

सांगली : हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा मृत्यू

आनंदराव पाटील यांच्यावर काही तासांपूर्वी दोघा अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला होता.

    सांगली, 2 फेब्रुवारी : अज्ञातांनी धारधार शस्त्रांसह केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खटाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांचा मृत्यू झाला आहे. आनंदराव पाटील यांच्यावर काही तासांपूर्वी दोघा अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. आनंद पाटील यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर मोटरसायकलवर पसार झाले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खटाव -भिलवडी रस्त्यावर असलेल्या आपल्या शेतातून आनंदराव पाटील हे परतत असताना साडेअकराच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला झाला. पाटील यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे. आनंदराव पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आहेत. या हत्याकांडाने सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. हेही वाचा- पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये गुंडांचा हैदोस, 70 गाड्यांची तोडफोड दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी मोटरसायकलवरून पळून गेले. त्यांना पकड करण्यासाठी पोलिसांनी खास पथक तयार केलं आहे. घटनास्थळी डॉग स्कॉडलाही आणण्यात आलं. याद्वारे जे काही संकेत मिळाले त्यानुसार पोलीस शोध मोहीम राबवत आहेत. हल्ल्याचं नेमकं कारण काय आहे याचा अद्याप उलगडा झालेला नाही. आनंदराव पाटील हे 15 वर्ष सरपंचही होते.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Murder, NCP, Sangali

    पुढील बातम्या