Home /News /maharashtra /

सांगली : डोंगरावर दिसलेल्या बिबट्याचा हुल्लडबाजांनी कुत्र्यांसह केला पाठलाग, Video Viral

सांगली : डोंगरावर दिसलेल्या बिबट्याचा हुल्लडबाजांनी कुत्र्यांसह केला पाठलाग, Video Viral

Leoperd in Sangali - बिबट्याच्या मागे धावताना जर बिबट्यानं हल्ला केला असता, आणि त्यात एखादा व्यक्ती जखमी किंवा मरण पावला असता, तर प्रशासनावर सर्वांनी ताशेरे ओढले असते.

सांगली, 13 जून : बिबट्या (Leopard) हा सध्याच्या काळात वरचेवर शहरांमध्ये दिसणारा प्राणी ठरत आहे. अनेक ठिकाणांहून बिबट्या आढळल्याच्या बातम्या येत असतात. या बिबट्यांमुळं नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात अशा प्राण्यांनाच आपल्यापासून धोका आहे, असं म्हणायला हरकत नाही. सांगलीहून (Sangali) आलेल्या एका व्हिडिओमधून असाच एक गंभीर प्रकार पाहायला मिळाला आहे. बिबट्या दिसल्यानंतर हुल्लडबाजी करत मागं पळणाऱ्या तरुणांनी त्याला पळवून लावल्याचा व्हि़डिओ समोर आला आहे. (वाचा-ऐकावं ते नवलंच! रुग्णाच्या मेंदूतून निघालं चेंडूच्या आकाराएवढं Black Fungus) सांगलीच्या कवठे महांकाळमधील अलकुड एम भागातील डोंगरावर बिबट्याचं दर्शन झालं. दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास याठिकाणी डोंगराच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर नागरिकांची एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. पण नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली नाही, तर काही तरुणांनी कुत्र्यांसह बिबट्याचा पाठलाग करत हुल्लडबाजी केल्याचंही दिसून आलं. हा बिबट्या उसाच्या शेतामध्ये लपला असून वनविभागाचे अधिकारी त्याला संरक्षित क्षेत्रात पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हुल्लडबाजांनी केलेल्या प्रकारामुळं संताप व्यक्त केला जात आहे. (वाचा-तुम्हाला आठवते का पेप्सीची चव! रोहित पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा) तातडीने या ठिकाणी वनविभागचे अधिकरी, कर्मचारी, तसेच मिरज, कवठेमहांकाळचे पोलीस पथक दाखल झाले आहे. मात्र बिबट्या दिसल्यानं परिसरात भीतीचं वाचावरण निर्माण झालं आहे. मात्र प्रत्यक्षात नागरिकांनी अशाप्रकारच्या बेजबाबदार वागण्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. कारण बिबट्याच्या मागे धावताना जर बिबट्यानं हल्ला केला असता, आणि त्यात एखादा व्यक्ती जखमी किंवा मरण पावला असता, तर प्रशासनावर सर्वांनी ताशेरे ओढले असते. काही दिवसांपूर्वी पुण्यात एक गवा शहरात आढळून आला होता. त्यावेळीही त्याला पडताना एकच धावपळ उडाली होती. या संपूर्ण प्रकाराने त्या गव्याचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारे वन्य प्राणी शहरांमध्ये दिसण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचे अधिवास आपणच नष्ट करत आहोत. त्यात जर अशाप्रकारे प्राण्यांना त्रास दिला जात असेल तर ते आपल्याला शोभणारं आहे, का याचा विचार करणं आता गरजेचं झालं आहे. कारण निसर्गाच्या साखळीसाठी हे प्राणीही अत्यंत महत्त्वाचे आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Leopard, Sangali, Sangli news

पुढील बातम्या