Home /News /maharashtra /

धक्कादायक खुलासा : सांगलीत वर्षभरापासून सुरू होता गर्भपाताचा गोरखधंदा!

धक्कादायक खुलासा : सांगलीत वर्षभरापासून सुरू होता गर्भपाताचा गोरखधंदा!

सांगलीतल्या गर्भपात प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. संशयित डॉक्टर दाम्पत्य हे शासकीय सेवेत असून, मागील एक वर्षांपासून ते इथं विनापरवाना गर्भपात करत असल्याचं समोर आलंय.

    सांगली, 16 सप्टेंबर - सांगलीतल्या गर्भपात प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. चौगुले हॉस्पिटलमधल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील संशयित डॉक्टर रुपाली चौगुले आणि पती विजयकुमार चौगुले हे शासकीय सेवेत असल्याचं समोर आलंय. मागील एक वर्षांपासून ते इथं विनापरवाना गर्भपात करत होते. या छाप्यामध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रं आणि दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. तसंच हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ठिकाणी 7 गर्भपात केल्याचं समोर आलंय. याप्रकरणी डॉक्टरसह तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यागर्भपात प्रकरणाच्या तपासासाठी कोल्हापूर, सोलापूर, सातारा या ठिकाणी पथकं रवाना करण्यात आली आहेत. पण नुकत्यात करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान त्यांनी आणखी दोन गर्भपात केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याठिकाणी करण्यात आलेल्या गर्भपातांची संख्या 7 वरून 9 झाल्याने झाल्याने सांगली शहरात खळबळ माजली आहे. सांगली शहरात बेकायदेशीर गर्भपात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मिळून संयुक्तरीत्या चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकत हा प्रकार उजेडात आणला. गेल्या एक वर्षांपासून विनापरवाना गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती समोर आले आहे. संशयास्पद कागदपत्रे आणि औषधे आढळून आली आहेत. त्याचबरोबर या छाप्यामध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि दारूच्या बाटल्या ही यावेळी सापडल्या आहेत. तसेच हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ठिकाणी 7 गर्भपात केल्याचे समोर आलेला होते. आज आणखी किती बेकायदा गर्भपात करण्यात आले आहेत. याचा तपास करण्यात आला. या प्रकरणी डॉक्टरासह तिघा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर तपासणी सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलकडून काही औषधपत्रे जाळण्यात आले आहेत. यानंतर पोलिसांनी याठिकाणचे औषधें व रोख रक्कम जप्त केली आहे. तर या हॉस्पिटलमध्ये आणखी बेकायदेशीर गर्भपात केल्याची शक्यता वर्तवली जात असून याबाबत आता तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा याठिकाणी पथके रवाना करण्यात आले असल्याचे पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांनी सांगितले. सांगली महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून उद्यापासून महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटल तपासणीसाठी १० पथके स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या पथकाकडून ७ दिवसांच्या आत तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली. तसेच या गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल झालेले डॉक्टर दांम्पत्य हे प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय डॉक्टर म्हणून सेवेत असल्याचे त्यांनी सांगितले असून या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असा इशाराही मनपा आयुक्तांनी दिला आहे. याचबरोबर सांगली सिव्हीलचे अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे हे सुद्धा या रुग्णालयात येत असल्याचे समोर आले असून डॉ. उगणे हे आता या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनाही नोटीस पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी म्हैसाळ येतील गर्भपातामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक हादरुन गेला होता. आणि पुन्हा एक वर्षा नंतर सांगली मध्ये बेकायदेशीर गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.  Bigg Boss 12: सलमान खानच्या घरात असेल एक अस्सल मराठी चेहरा
    First published:

    Tags: Chougule hospital, Illegal abortion, Rupali chougule, Sangali, Vijaykumar chougule

    पुढील बातम्या