Home /News /maharashtra /

येथे सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करून मिळेल !

येथे सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करून मिळेल !

लाखमोलाच्या वस्तऱ्यानं दाढी करू इच्छिणाऱ्यांना दोनशे रुपये मोजावे लागणार आहेत. पण हौसेला मोल नसतं. त्यामुळे अनेकांनी रामचंद्र यांच्याकडे बुकिंग सुरू केलंय.

आसिफ मुरसल, सांगली 17 मे : सोन्याचे दागिने...सोन्याची भांडी...सोन्याचा मोबाईल तुम्ही बघितला असेल तर पण सोन्याचा वस्तरा कधी बघितलाय का? तुम्ही सोन्याचे शौकीन असाल तर तुम्हाला सोन्याच्या वस्तऱ्यां दाढी करता येणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला सांगलीला जावं लागेल..इतकंच... आपल्याकडे सोन्याला श्रीमंतीचं प्रतिक मानलं जातं. पण हेच प्रतिक वापरून श्रीमंत होण्याची शक्कल शक्कल सांगलीतल्या रामचंद काशीदनं लढवली. उस्तरा मेन्स स्टुडिओचा मालक रामचंद काशीदने याने सोन्याचा वस्तारा बनवण्याचं ठरवलं. जो पर्यंत सोन्याचा वास्तरा बनवत नाही, तो पर्यंत स्वतःचे केस आणि दाढी न कापण्याचा पण त्याने केला. गेल्या चार महिन्यापासून स्वतःचे केस आणि दाढी केली नाही. सोन्याचा वास्तरा बनवण्यासाठी त्याने अनेक सोनारांशी सम्पर्क केला. हा सोन्याचा वस्तरा बनवून देण्यासाठी कोणताही सराफ तयार होत नव्हते. रामचंद्र यांचं सोन्याचा वस्तरा बनवण्याचं स्वप्नं पुण्यातील मिथुन राणा या कारागिरानं साकार केलं. मोठ्या कष्टानं 20 दिवसात साडे दहा तोळ्यांचा हुबेहुब सोन्याचा वस्तरा तयार झाला. ज्याची किंमत आहे साडे तीन लाख रुपये... रामचंद यांनी वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला सोन्याच्या वस्तऱ्यानं दाढी करून वस्तऱ्याचा श्रीगणेशा केला. लाखमोलाच्या वस्तऱ्यानं दाढी करू इच्छिणाऱ्यांना दोनशे रुपये मोजावे लागणार आहेत. पण हौसेला मोल नसतं. त्यामुळे अनेकांनी रामचंद्र यांच्याकडे बुकिंग सुरू केलंय. एखाद्याच्या श्रीमंतीचं वर्णन करण्यासाठी तोंडात सोन्याचा चमका घेऊन जन्माला आला अशी म्हण आपण वापरू शकतो. यापुढे सोन्याच्या वस्तऱ्यानं तो दाढी करतो अशी म्हण प्रचलीत झाली तर आश्चर्य वाटायला नको...
First published:

Tags: Sangali, सांगली

पुढील बातम्या