Home /News /maharashtra /

मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही, सांगलीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक

मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही, सांगलीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक

दुष्काळाच्या प्रश्नावरून सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे.

    सांगली, 13 मे : दुष्काळाच्या प्रश्नावरून सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. आजपासून सांगली जिल्ह्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा 'वंचित'चे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. ‘मंत्र्यांनी बिनकामाचे दुष्काळी दौरे करू नयेत. मंत्र्यांना दुष्काळी भागात फिरू देणार नाही. फक्त फॉर्मेलिटी नको, दुष्काळाच्या नावाखाली फक्त सहली चालू देणार नाही. हे मंत्री जिल्ह्यात दिसले तर वंचित आघाडीकडून रोखू,’ असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. गोपीचंद पडळकर हे सांगली लोकसभा मतदारसंघातून 'वंचित'चे उमेदवारदेखील आहेत. दुष्काळावरून राष्ट्रवादीही आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या महाराष्ट्रभर फिरून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. साताऱ्याच्या दौऱ्यानंतर सोमवारी शरद पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून दुष्काळ निवारणातातल्या त्रुटींचा त्यांनी आढावा घेतला. काही फळबागांना ते भेट देऊन पाहणी करणार आहेत. चारा छावणीला भेट देऊन छावणी मालकांच्या अडचणी समजून घेणार आहेत. आष्टी तालुक्यातून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची चर्चा केली. सरकारकडून मदतीची घोषणा महाराष्ट्रात वाढता दुष्काळ पाहता केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी राज्याला मदत करण्यात आली. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ, केंद्र सरकारकडून आणखी 2160 कोटी रूपये मदतीपोटी प्राप्त झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे. यासंदर्भात फडणवीसांनी ट्वीट करत मोदींचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळासाठी आतापर्यंत 4248.59 कोटी रूपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले अशीही माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे. VIDEO : कपड्यांच्या दुकानाला मोठी आग, परिसरातील लोकांमध्ये खळबळ
    First published:

    Tags: Sangali

    पुढील बातम्या