Home /News /maharashtra /

दुग्धोत्पादन क्षेत्रात 'चितळे' क्रांती : यापुढे फक्त मादीच येणार जन्माला !

दुग्धोत्पादन क्षेत्रात 'चितळे' क्रांती : यापुढे फक्त मादीच येणार जन्माला !

दुध उत्पादन वाढावे यासाठी सांगलीतल्या चितळे दूध समूहाने अनुवंशिक कृत्रिम रेतनाचा प्रयोग राबवला. तीन वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी एका रेडीला जन्माना घातलंय.

    आसिफ मुरसल, सांगली, 17 ऑक्टोबर : भारताती दूध उत्पादन वाढावे यासाठी सांगलीतल्या चितळे दूध समूहाने अनुवांशिक कृत्रिम रेतनाचा प्रयोग राबवला. 'ब्रह्म' या प्रकल्पाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या वैज्ञानिक प्रयोगाला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी फलश्रुती मिळाली. तीन वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी एका रेडीला जन्माला घातलंय. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जन्माला आल्यामुळे त्यांनी तिचं नाव दुर्गा असं ठेवलंय. तसं पहिलं तर हा एक वैज्ञानिक चमत्कारच म्हणावा लागेल. भारतातील दूध उत्पादन क्षेत्रातलं हे एक क्रांतीकारक पाऊल आहे. प्रत्यक्ष नर आणि मादीच्या मिलनातून आणि कृत्रिम रेतनातून जन्माला येणाऱ्या नर आणि मादींचं प्रमाण हे सारखंच असतं. मात्र, नर जन्माला आला तर त्याचा दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी अधिकाधीक रेडीला जन्माला घालण्यासाठी चितळे समुहाने हा प्रयोग राबविला. चितळे दूध समूह आणि जीनियस एबीएस यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या 'ब्रह्म ' या प्रकल्पाच्या माध्यमातून हा वैज्ञानिक चमत्कार घडून आलाय. तब्बल तीन वर्षांच्या अथक प्रयासानंतर अनुवंशिक कृत्रिम रेतनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला. म्हैस आणि गाईंच्या कृत्रिम रेतनासाठी या प्रकल्पांत 100 हून अधिक रेडे आणि वळूंची जोपासना केलीय. उच्चतम उत्पादन क्षमता असलेल्या अमेरिकेतल्या वळूंची भारतात आयात करून त्यांची 'ब्रह्मा' या बुल सेंटरमध्ये जोपासना केली जातेय. दूर्गाच्या जन्मासाठी महाबली या रेड्याच्या सिमेनचा वापर करण्यात आला होता. महाबली नामक वळूच्या सिमेनचा पहिला प्रयोग मुऱ्हा जातीच्या म्हशीवर करण्यात आला. आणि त्यातूनच दुर्गाचा जन्म झाला. ही दुर्गा शेतकऱ्यांच्या अंधकारमय जीवनातील अनुत्पादक रूपात असलेल्या महिषासुरचा नक्कीच वध करेल असा ठाम विश्वास चितळे समुहाने व्यक्त केलाय. या प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे या कृत्रिम रेतनातुन ९० टक्के मादी जातीची पैदास होईल. ज्यामुळे दुध उत्पादनाच्या क्षेत्रात आपोआप भरभराट होणार आहे. शिवाय या प्रयोगातून पैदास होणाऱ्या रेडी या अधिकतम दूध उत्पादन देणाऱ्या असणार आहेत. एका वेळेत १२०० लिटर दुध देणाऱ्या म्हशींच्या तुलनेत या प्रयोगातून जन्माला येणाऱ्या गाई-म्हशी या किमान ८ ते १० हजार लिटर दुधाचे उत्पादन देतील. भारतातच नव्हे तर हा जगातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा चितळे समूहाने बुधवारी पत्रकार परिषदेत केलाय. तर हा प्रयोग भारतीतील दुग्ध व्यवसायातील क्रांती ठरेल असा विश्वास यावेळी चितळे बंधूनी व्यक्त केलाय. जगभरात दूध उत्पादन क्षेत्रात अमेरिका सर्वात अग्रगण्य असल्याचे मानले जाते. तर मुबलक गोवंश असला तरी भारत दूध उत्पादन क्षेत्रात मागेच आहे. त्यावर मात करण्याच्या उद्देशाने सांगलीच्या चितळे समूह आणि जीनियस एबीएस संस्थेच्या वतीने भिलवडी येथे भारतातील दूध उत्पादन क्षेत्राला नवी दिशा देणारा प्रयोग यशस्वी ठरलाय अशी माहिती चितळे उद्योग समूहाचे संचालक काकासाहेब चितळे आणि विश्वासराव चितळे यांनी न्यूज18 लोकमतला दिली. VIDEO: वाहन तपासणी करताना कार चालकानं वाहतूक पोलिसालाच उडवलं
    First published:

    Tags: Artificial insemination, Chitali gropu, Invention, Milk production, Sangali

    पुढील बातम्या