जळगावमध्ये सकाळी 11 पर्यंत 22 टक्के तर सांगलीत 18 टक्के मतदान

जळगावमध्ये सकाळी 11 पर्यंत 22 टक्के तर सांगलीत 18 टक्के मतदान

सांगली मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. दोन्ही महानगरपालिकेच्या एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

  • Share this:

सांगली/जळगाव, 01 ऑगस्ट : सांगली मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. दोन्ही महानगरपालिकेच्या एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी 7.30 वाजल्यापासून ते 5.30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. सांगली महापालिकेत एकूण 20 प्रभाग आहेत. त्यापैकी अठरा प्रभाग हे चार सदस्यांचे तर दोन प्रभाग हे तीन सदस्यांचे आहेत.

निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसची राष्ट्रवादीसोबत आघाडी आहे. तर भाजप, सेना, जिल्हा सुधार समिती, आप, आणि अपक्षांसह 457 उमेदवार आपलं नशिब आजमावताहेत. मतदारांची संख्या सुमारे 4 लाख 23 हजार 366 इतकी आहे. तर जळगाव महापालिकेसाठीही आज मतदान होतंय. जळगाव महापालिकेत एकून 19 प्रभागातील 75 जागांसाठी मतदान होतंय. त्यापैकी महिलांसाठी 38 जागा राखीव ठेवण्यात आल्यात.

जळगाव जिल्हा हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला असल्यानं या ठिकाणी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीये. येत्या 3 ऑगस्टला या दोन्ही महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे.

सांगली मिरज-कुपवाड महापालिकेचा आखाडा

1. प्रभाग 16

हारुण शिकलगार, (महापौर) काँग्रेस

राजेश नाईक, अपक्ष,

आसिफ बावा, अपक्ष

2. प्रभाग 15

मंगेश चव्हाण, काँग्रेस

रणजित पाटील, भाजप

3. प्रभाग - 5 मिरज

इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादी काँग्रेस

करण जामदार, काँग्रेस प्रभाग - ५ मिरज

4. प्रभाग - 6

अतहर नायकवडी, राष्ट्रवादी

अल्लाउद्दीन काझी, अपक्ष

5. प्रभाग - 4

निरंजन आवटी, भाजप

अनिल कुलकर्णी, अपक्ष

6. प्रभाग 7

किशोर जामदार, काँग्रेस

गणेश माळी, भाजप

महत्त्वाचे मुद्दे -

1. सांगली शहराची हद्दवाढ

1) आरोग्य, पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा

2) तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न, नोकऱ्या नाहीत

3) वाढत्या वाहतुकीचा प्रश्न

4) महापालिका भ्रष्टाचार मुद्दा

5) सोनेरी टोळी, दलबदलू नेते

6) गुंठेवारी नियमितीचा प्रश्न

7) मोकाट जनावरांचा प्रश्न

8) एमआयडीसी रोजगार आणि सुविधा

9) मराठा आरक्षण

जळगाव महापालिकेचा आखाडा

एकूण जागा - 75

खान्देश विकास आघाडी (सुरेशदादा जैन) - 33

भाजप - 15

मनसे - 12

राष्ट्रवादी - 11

जनक्रांती पार्टी - 02

महाराष्ट्र विकास आघाडी - 01

अपक्ष - 01

राजकीय समीकरणं

- खान्देश विकास आघाडी रिंगणात नाही

- सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना रिंगणात

- मनसेचे महापौर ललीत कोल्हेसह सर्व सदस्य भाजपचे उमेदवार

- भाजपचं नेतृत्व गिरीश महाजनांकडे

- भाजप आणि शिवसेनेच्या युतीसाठीचे प्रयत्न फसले

- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये झाली आघाडी

- खरी चुरस शिवसेना आणि भाजपमध्येच

- निवडणुकीत दोघांचाही प्रमुख मुद्दा विकास

 

First published: August 1, 2018, 8:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading