अंत्यविधीला जाणाऱ्या 5 जणांवर काळाचा घाला, स्टेरिंग लॉक झाल्यानं कार विहिरीत कोसळली

अंत्यविधीला जाणाऱ्या 5 जणांवर काळाचा घाला, स्टेरिंग लॉक झाल्यानं कार विहिरीत कोसळली

सांगलीच्या आटपाडीच्या झरे-पारेकरवाडीदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.

  • Share this:

आसिफ मुरसल (प्रतिनिधी) सांगली, 03 फेब्रुवारी: आटपाडी तालुक्यातील पारेकरवाडी इथे भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांचा या अपघातात मृत्यू झाला. नातेवाईकच्या अंत्यविधिला जात असताना या कुटुंबावर काळानं घाला घातला. ही घटना रविवारी रात्री 10च्या सुमारास घडली आहे. सांगलीच्या आटपाडीच्या झरे-पारेकरवाडीदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गाडीने मायणी इथे निघाले होते. पारेकरवाडीपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर पोचले असता अचानक व्हॅगनार गाडीचे स्टेरिंग लॉक झाले आणि गाडीवरील चालकाचा ताबा सुटला. कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट विहिरीत कोसळली. विहिर पाण्यानं भरलेली असल्यामुळे गाडीचे दरवाजेही उघडू शकले नाहीत.

या अपघातमध्ये मच्छिंद्र पाटील ,कुंडलीक बरकडे , गुंडा डोंबाळे, संगीता पाटील, शोभा पाटील, यांचा मृत्यू झाला आहे. तर गाडीच्या काचा फोडून बाहेर पडलेले हरिबा वाघमारे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या मदतीनं कार विहिरीबाहेर काढण्यात आली.

हेही वाचा-दिल्लीत पुन्हा वातावरण तापलं, जामिया मिलिया इस्लामियाच्या गेट नंबर 5वर गोळीबार

हेही वाचा-राशीभविष्य: गुंतवणूक करताना वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी सांभाळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2020 08:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading