नाराज नाईक कुटुंब भाजपमध्ये राहणार की नाही? संदीप नाईक म्हणतात...

नाराज नाईक कुटुंब भाजपमध्ये राहणार की नाही? संदीप नाईक म्हणतात...

गणेश नाईक भाजप सोडण्याबाबत विचार करत आहेत का, अशी चर्चा सुरू झाली होती.

  • Share this:

नवी मुंबई, 2 ऑक्टोबर : भाजपने पहिल्या उमेदवार यादीत डावलल्यानंतर नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. त्यामुळे गणेश नाईक भाजप सोडण्याबाबत विचार करत आहेत का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र आता नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांनी याबाबत खुलासा केला आहे.

'नाईक कुटुंब भाजपमध्येच आहे. आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नाही. भाजपकडून उद्या मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. गणेश नाईकही प्रचारात उतरणार आहेत,' अशी माहिती संदीप नाईक यांनी दिली आहे. त्यामुळे नाईक भाजप सोडण्याचा विचार करत असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, नवी मुंबईच्या बेलापूर मतदारसंघातून आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे नुकतेच भाजपमध्ये गेले गणेश नाईक हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर आता गणेश नाईकांनी महापालिका नगरसेवकांची महत्त्वाची बैठक बोलावली होती.

भाजपने विधानसभेसाठी पहिल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये गणेश नाईक यांना मोठा धक्का बसला. कार्यकर्ते आणि कुटुंबासह भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक यांना तिकीट मिळण्याची शक्यता असताना दिल्लीतून जाहीर केलेल्या यादीत त्यांच्या जागी मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली. बेलापूर मतदार संघातून आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

भाजपच्या महिला आमदारानी नाकारली राज ठाकरे-अजित पवारांची ऑफर, दिलं हे उत्तर

First published: October 2, 2019, 1:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading