काकांना मंत्रिपद देऊन युतीची खेळी, आता संदीप क्षीरसागरांकडून जोरदार प्रत्युत्तर

काकांना मंत्रिपद देऊन युतीची खेळी, आता संदीप क्षीरसागरांकडून जोरदार प्रत्युत्तर

जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देत सत्ताधारी युतीने राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागर यांच्यावर कुरघोडी केल्याची चर्चा होती.

  • Share this:

बीड, 18 जून : नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात बीड जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. बीडच्या इतिहासामध्ये जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळण्याची पहिलीच वेळ आहे. बीड जिल्ह्यात तब्बल 24 वर्षांनंतर शिवसेनेला मंत्रिपद मिळाल्याने 'अच्छे दिन' आले आहेत.

राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर हे संदीप क्षीरसागर यांचे काका आहेत. या काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण जिल्ह्याला ज्ञात आहे. त्यामुळेच जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देत सत्ताधारी युतीने राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागर यांच्यावर कुरघोडी केल्याची चर्चा होती. यातच आता संदीप क्षीरसागर यांनीही या खेळीला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच संदीप यांनी पाणीप्रश्नावरून आक्रमक होत मोर्चा काढला. त्यामुळे आगामी काळात काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष आणखीनच टोकदार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिवंगत केशर काकू क्षीरसागर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी बीड जिल्ह्याचे राजकीय नेतृत्त्व राज्यस्तरावर केले. मात्र, एकाच वेळी बीड जिल्ह्याला 2 कॅबिनेट मंत्री पदे बीडच्या राजकीय इतिहासात कधीच मिळालेले नाहीत. यावेळी शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने बीडच्या वाट्याला 2 कॅबिनेट मंत्रिपदे आली आहेत.

काय आहे फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला?

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा फॉर्म्युला 10,2,1 असा आहे. भाजपला 10, शिवसेनेला 2 तर रिपाइंला एक अशी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. रिपाइंच्या कोट्यातून अविनाश महातेकर, शिवसेनेकडून नुकतेच सहभागी झालेले जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे.

या नेत्यांची मंत्रिपदी लागली वर्णी..

कॅबिनेट मंत्री

-राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)

-जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)

-आशिष शेलार (भाजप)

-संजय कुटे (भाजप)

-सुरेश खाडे (भाजप)

-अनिल बोंडे (भाजप)

-तानाजी सावंत (शिवसेना)

-अशोक उईके (भाजप)

राज्यमंत्री

-योगेश सागर (भाजप)

-अविनाश महातेकर (रिपाइं-आठवले गट)

-संजय (बाळा) भेगडे (भाजप)

-परिणय रमेश फुके (भाजप)

-अतुल सावे – (भाजप)

SPECIAL REPORT : माणुसकी मेली का हो! चिमुकल्यासोबत असं करण्याची हिंमत कशी होते?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2019 12:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading