पिंपरी चिंचवडकरांनो, हे आहेत तुमचे नवीन पोलीस आयुक्त!

पिंपरी चिंचवडकरांनो, हे आहेत तुमचे नवीन पोलीस आयुक्त!

पिंपरी चिंचवडचे प्रथम पोलीस आयुक्त म्हणून काम केल्यामुळे मी समाधानी असल्याचं सांगत पद्मानाभन यांनी चर्चेला विराम दिला. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांची बदली केल्यामुळे राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 22 सप्टेंबर : पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तीपदी आज संदीप बिष्णोई यांची निवड करण्यात आली आहे. संदीप बिष्णोई हे पिंपरी चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत तर मावळते पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन हेदेखील या यावेळी उपस्थित होते. खरंतर पद्मनाभन यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली केल्यामुळे त्यांची नेमकी बदली झाली की उचल बांगली केली अशा चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवडचे प्रथम पोलीस आयुक्त म्हणून काम केल्यामुळे मी समाधानी असल्याचं सांगत पद्मानाभन यांनी चर्चेला विराम दिला. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांची बदली केल्यामुळे राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. तर नवे पोलीस आयुक्त बिष्णोई यांच्यासमोर पिंपरी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचं मोठं अंवाहन आहे. त्यातच   विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिष्णोई यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या कामगिरीकडे शहरवासियांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या - भ्रष्ट्रचाराविरुद्ध 23 आंदोलन; आता उघड्यावर अंडरवेअर सुकवण्यावरून FIR दाखल!

आपण काम करत असताना नागरिकांकडूनही सहकार्याची अपेक्षा असल्याचं बिष्णोई म्हणाले. तर पोलीस आणि राजकीय पदाधिकारी एकत्र काम करू शकतात. राजकीय हस्तक्षेप असा काही प्रकार नसतो असा दावा बिष्णोई यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या कामावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भर रस्त्यात तरुणांची गुंडगिरी, महिलेवर अत्याचार, खुन्याच्या धक्कादायक घटना, बाईक पेटवणं अशा अनेक घटना वारंवार समोर येतात. त्यामुळे पिंपरीत नागरिक सुरक्षित नसल्याचं चित्र आहे. पण हे सगळे प्रकार थांबवण्यासाठी पोलीस काय प्रयत्न करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यात आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कामात सर्तकता असणार आहे.

Loading...

इतर बातम्या- युती 100 टक्के होणार पण 'या' मुद्द्यावरून भाजप सेनेला झुकवणार!

VIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 11:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...