Home /News /maharashtra /

रेतीने भरलेल्या टिप्परने तरुणाला चिरडले, तरुणाचा मृतदेह पाहून सगळेच स्तब्ध झाले

रेतीने भरलेल्या टिप्परने तरुणाला चिरडले, तरुणाचा मृतदेह पाहून सगळेच स्तब्ध झाले

साकेतच्या मृत्यूमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    प्रवीण तांडेकर, प्रतिनिधी गोंदिया, 09 मार्च  :  दुचाकीने महामार्गावरून जात असलेल्या एका १९ वर्षीय तरुणाला भरधाव वेगाने रेती भरुन जाणाऱ्या टिप्परने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली हे. या अपघातात हा तरुण जागीच ठार झाला. आज दुपारी 3 वाजेच्या सुमासास  गोंदिया-बालाघाट मार्गावर नागरा या गावाजवळ ही घटना घडली. या अपघातात युवक जागीच ठार झाला आहे,  मृतकाचे नाव  साकेत शेंडे असून साकेत हा हॉबीटोला सावरी येथील रहिवासी आहे. हा अपघात इतका भीषण होता की, रेतीने भरलेल्या टिप्परच्या धडकेत साकेत चाकखाली सापडला गेला. त्यामुळे त्याचा चेंदामेंदा झाला होता. बऱ्याच काळ त्याचा मृतदेह हा महामार्गावरच पडून होता. साकेतच्या मृत्यूमुळे काही काळ  परिसरात तणावाचे वातावरण  निर्माण झाले होते. वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल होताच परिस्थिती आटोक्यात आणली. टिप्पर चालक घटना स्थळवरून फरार झाला असून पोलिसांनी फरार झालेल्या टिप्पर चालका विरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. कार आणि मोटरसायकलच्या रेसिंगमध्ये  3 मुलांचा मृत्यू दरम्यान, धूम स्टाईल रेसिंग करणं हे मुलांच्या जीवावर बेतलं आहे. गोव्यातल्या शांत आणि निसर्गरम्य परिसरात अफाट वेगात मोटरसायकल आणि कारची रेसिंग जीवघेणी ठरली. रेसिंग करताना अपघात झाला आणि या अपघातात गोव्यातल्या वेर्णा इथं तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. ही मुलं नववी आणि दहावीच्या वर्गातली आहेत. दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या जवळ असलेल्या पठारावर हा अपघात झाला. या ठिकाणी मोठे पठार असून कायम तिथे अनेक तरुण मोटरसायकल आणि कारची रेसिंग करत असतात. अशा एका ग्रुपचा थरार सुरु असताना हा अपघात झाला आणि तीन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. रोहन सिक्वेरा, इथन फर्नांडिस आणि जोशुवा बारेटो हे आपल्या मित्रांसोबत रेसिंगसाठी या पठारावर येत होते. या आधीही त्यांनी अशीच रेस खेळल्याची माहिती पुढे आलीय. हे सर्व मित्र सुसाट वेगात गाड्या चालवत होते. वेगाच्या धुंदीत गाड्या चालवत असताना सर्वच तरुण बेभान झाले होते. त्याच वेळी कार चालवत असलेल्या मुलाचा कारवरचा ताबा सुटला आणि कार पठाराच्या शेजारी असलेल्या दरीत कोसळली. यावेळी कारमध्ये रोहन, इथन आणि जोशुवा हे तीन मित्र होते. कार दरीत कोसळली आणि त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला मडगावच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असताना त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Gondiya, Gondiya accident, Gondiya news, Rape

    पुढील बातम्या