साहेबराव कोकणे, प्रतिनिधी
अहमदनगर, 22 जानेवारी: अहमदनगर जिल्ह्यात सीन, प्रवरा, गोदावरी नगर तालुक्यातील के के रेंजमधील नदीपात्रातून खुलेआम वाळू उपसा सुरू आहे. वाळूतस्करांवर कारवाई करणे गरजेचे असताना पोलीस आणि वाळू माफिया यांचे संबंध असल्याचे समोर आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातून गोदावरी, प्रवरा, सीन, घोड नदी आणि मुळा डॅमचे बॅक वॉटर दररोज ५० ते ६०हायवा ट्रक आणि ट्रॅक्टरने वाळूचा उपसा सुरू असून या वाळू तस्करीच्या व्यवसायात पोलीसच सामील असल्याचे पुढे आलं आहे. अहमदनगर जिल्हात सध्या कुठलाही वाळू ठेका चालू नाही. त्यामुळे हा सगळं वाळूतस्करीचा व्यवसाय चालतो. नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत केडगाव पोलीस चौकीत असलेल्या काही पोलिसांनी वाळूचा डम्पर पकडला त्यावेळीस गाडीचा चालक पोपट माळी याची चौकशी केली. त्यावेळी डम्पर मालकाने पोलीस राहुल खरात यांच्याकडे महिन्याचे कार्ड चालू आहे. तुमचे बोलणे करून देतो कारवाई करून नका, असं मालकानं सांगितलं. त्यानंतर हप्ता घेणाऱ्या पोलिसांचा राहुल नावाच्या इसमाने डंपर चालक पोपट माळी याचा दुसऱ्या दिवशी मोबाईलवर व्हिडिओ बनविला आणि तो मीडियापर्यंत पाठवण्याची व्यवस्था केली.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या व्हिडिओमध्ये पोलिसांनी पैसे घेऊन सोडल्याचा आरोप डंपर चालक पोपट माळी यांनी केलाय. त्या वरून पोलीस कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी आरोपीचा जबाब घेऊन वरिष्ठाना आवाहल पाठविला आणि चार पोलिसांना निलंबित केलं.
या सर्व प्रकरणातून पोलीस आणि वाळूतस्करांची संबंध आहे हे सिद्ध होतंय. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश असल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शाम असावा यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे.
अवैध वाळूतस्करी रोखण्याची जबाबदारी महसूल आणि पोलिसांवर आहे. मात्र, या धाडी टाकताना काही पोलीस कर्मचाऱ्यांचे या धंदेवाईकांशी एवढे सलोख्याचे संबंध निर्माण झाले की, आता त्यांनीच भागीदारीत हा व्यवसाय सुरू केला आहे. अर्थात ही भागीदारी कुठेही रेकॉर्डवर नसल्याने कुणालाही सिद्ध करणे शक्य नाही. मात्र, ही भागीदारी पोलीस खात्यात कुणापासूनच लपलेली नाही. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले नातेवाईक आणि विश्वासू व्यक्तींच्या नावावर वाळूतस्करीसाठी वाहने घेतली आहेत. या वाहनातून अवैध वाळू वाहतूक सर्रास केली जाते. अन्य वाहनांना त्यापोटी हप्ता द्यावा लागतो; मात्र, पोलिसांची वाहने म्हणून प्रत्येकी ३० व ४० हजार रुपये हप्ता घेतला जात असल्याची चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.