Home /News /maharashtra /

संतापजनक, वाळू माफियाच्या गाडीने शेतकऱ्याला चिरडले, मृतदेहाचे झाले 3 तुकडे!

संतापजनक, वाळू माफियाच्या गाडीने शेतकऱ्याला चिरडले, मृतदेहाचे झाले 3 तुकडे!

राक्षसभुवन येथून नदीपात्रातील वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. रात्रीतून शेकडो ब्रास वाळू येथून अवैध पद्धतीने उपसून तस्करी केली जाते.

बीड, 04 जानेवारी : बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई  वाळू माफियांच्या (sand mafia) उच्छादाची मन हेलावून घटना समोर आली आहे.  शेतकऱ्याला चिरडून वाळू माफियाचा टिप्पर पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याच्या शरीराचे अक्षरशः तीन तुकडे झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. रुस्तुम बाबाजी मते ( वय 65 वर्ष) असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे.   या अपघाता शेतकऱ्याच्या शरीराचे अक्षरशः तीन तुकडे झाले असून वाळू माफियावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेत ग्रामस्थांनी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले आहे. Google Pay सांगणार गेल्या वर्षात किती पैसे खर्च केले; जाणून घ्या डिटेल्स राक्षसभुवन येथून नदीपात्रातील वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. रात्रीतून शेकडो ब्रास वाळू येथून अवैध पद्धतीने उपसून तस्करी केली जात आहे. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेताकडे निघालेले शेतकरी रुस्तुम बाबाजी मते यांना वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा, टिप्परने अक्षरशः चिरडले. जोरात धडक बसल्यामुळे बाबाजी मते गाडीच्या चाकाखालीच सापडले. या अपघातात बाबाजी मते जागेवरच ठार झाले. त्यांच्या मृतदेहाचे अक्षरश: तीन तुकडे झाले होते. ही घटना कळताच ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत रस्ता रोखून धरला होता. तसंच अवैध वाळू वाहतूक बंद करून कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत वाळू माफियावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात तरुणाने घेतले विष दरम्यान, बीडमधील  पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात एका तरुणा विष घेतल्याची धक्कादायक घटना घडली.  या तरुणाला तातडीने  बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अलविदा शेरा! Dog Squad मधील श्वानाच्या निधनानंतर गृहमंत्री अनिल देशमुख भावुक इम्तियाज आमेन बकुरेशी (वय 30) असं विष घेणाऱ्या तरुणाचं नाव आहे.  बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात आज दुपारी 12.30 च्या दरम्यान ही घटना घडली. पत्नीला नांदवण्यास घेऊन जाणार नाही म्हणत इम्तियाज आमेन कुरेशीने विष प्राशन केले. गेवराई शहरातील रहिवाशी असलेल्या इम्तियाज आमेन कुरेशी यांचे लग्न 10 वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना दोन अपत्य आहेत. एका वर्षापूर्वी पती पत्नीत वाद झाल्यापासून त्यांची पत्नी माहेरी राहत होती. पत्नीला नांदवण्यास नकार दिल्याने 20  दिवसांपूर्वी पत्नीने तक्रार केली होती. पोलिसांनी त्याची समजूत काढली पण त्याने पत्नीला नांदवण्यास नकार दिला. अखेर आज त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या