पंढरपूर हादरलं, अवैध वाळू उपसा करणाऱ्या गाडीच्या धडकेत पत्नी ठार, पती जखमी

पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागात भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे.

पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागात भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे.

  • Share this:
पंढरपूर, 15 डिसेंबर : पंढरपूरमध्ये  (Pandharpur) अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनाने बळी घेतल्याची घटना समोर आली आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीने दुचाकीवरुन जाणाऱ्या पती-पत्नीला जोरात धडक दिली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पती गंभीर जखमी असल्याने त्यांना सोलापूरला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्रकाश आणि जयश्री बारले असं पती-पत्नी यांची नावे आहेत. पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागात भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. 24 तास हा अवैध वाळू उपसा होत असून यामध्ये बिगर नंबर प्लेटच्या गाड्यांचा सर्रास वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! चेक पेमेंट करण्याची पद्धत बदलणार आज सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान हे पती-पत्नी आपल्या दुचाकीवरून कराडकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की,  जवळपास 50 फुटापर्यंत पिकअप व्हॅनने दुचाकीला फरफटत नेले यामध्ये पत्नी जागीच ठार झाली आहे. तर पती गंभीर जखमी आहे. त्यांना तातडीने  सोलापूरला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंढरपूर सोलापूरला जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने या पुलावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो प्रशासनाला वारंवार निवेदन आंदोलन करून देखील आजही वाळू उपसा थांबलेला नाही. ...तर इतका घाम फुटायचे कारण काय? सेनेनं दिला फडणवीसांना इशारा नुकतेच पंढरपूर दौऱ्यावर आलेले घर राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. चार दिवस झाले नाही तरीसुद्धा हा अवैध उपसा सुरू आहे. यावेळी गृहराज्यमंत्र्यांनी यामध्ये पोलिसांचा सहभाग असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, कुठलीही कारवाई झाली नसल्याने आज पुन्हा वाळू उपशाने एकाचा बळी घेतला.
Published by:sachin Salve
First published: