वैभव राऊत आमचा साधक नाही, सनातनने आरोप फेटाळले

वैभव राऊत आमचा साधक नाही, सनातनने आरोप फेटाळले

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेले 9 जण हे सनातन संस्थेचे साधक नाहीत वैभव राऊतचा सनातनशी संबंध नाही असं स्पष्टीकरण सनातन संस्थेनं आज पत्रकार परिषदेत दिलं.

  • Share this:

मुंबई,ता. 27 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेले 9 जण हे सनातन संस्थेचे साधक नाहीत वैभव राऊतचा सनातनशी संबंध नाही असं स्पष्टीकरण सनातन संस्थेनं आज पत्रकार परिषदेत दिलं. मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस आणि हिंदू जनजागृतीचे महाराष्ट्र संघटक सुनिल घनवट यांनी सनातनवर होत असलेले आरोप फेटाळून लावले. सनातनवर बंदीची जे लोक मागणी करताहेत त्यांचीच चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

नालासोपारा स्फोटकं जप्ती प्रकरणानंतर तपासाची चक्र फिरली आणि कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधीत असलेल्या अनेकांना अटक झाली. आणि हत्याकांडाचा उगलडा झाला. हा कट कुठेले शिजला, कधी शिजला, प्रशिक्षण कुठे दिलं गेलं, कुणी दिलं, टार्गेट कोण होतं, हिट लिस्ट मध्ये नावं कुणाची होती, मिशनला नाव काय होतं अशा सगळ्या गोष्टींची माहिती बाहेर आल्याने या प्रकरणात सनातन आणि सनातनशी संबंधीत संस्थांवर तपास यंत्रणांवर संशयाची सुई वळली होती.

मराठा मोर्चात घातपाताचा कट होता अशी माहितीही बाहेर आली. नालासोपार इथं वैभव राऊत याच्या घरातून स्फोटकं जप्त करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या चौकशीतून एक एक उलगडा होत गेला आणि सनातनवर चौफेर टीका होऊ लागली. संस्थेला बदनाम करण्यासाठीच असे आरोप करण्यात येत असल्याचंही सनातनने म्हटलं आहे.

 

First published: August 27, 2018, 3:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading